अकलूज च्या मुस्लिम समाजातील “कोहिनूर” हिरा म्हणजे दादाभाई तांबोळी…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
🎯 “दादाभाई” यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…
दादा तांबोळी म्हणुनच अकलूज च्या जनमानसात ओळख असणारे तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणजे कासीम अ रज्जाक तांबोळी यांचा आज वाढदिवस,प्रथमतः दादाभाई तांबोळी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
साधारणपणे 2005 च्या अकलूज ग्रामपंचायत निवडणुकी द्वारे हा “कोहिनूर” हिरा समाज चळवळीच्या माध्यमातून सबंध अकलूजकरांच्या हाती लागला अन् तेथून पुढे मागे न पाहता दादाभाई तांबोळी यांनी मिळालेल्या संधीच सोने करत आपल्या समाज कार्याची छाप समस्त अकलूज करावर सोडली…

बघता बघता अकलूजच्या मुस्लिम चळवळीतील एक अग्रगण्य नाव म्हणून दादाभाई तांबोळी यांनी सोलापूर जिल्ह्यात आपले नांव सर्वदूर पसरवले…
अल्पावधीत आपल्या अंगी असणारी कार्यकर्त्याची चुणूक दादाभाई तांबोळी यांनी दाखवली,त्यामुळेच तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून हि त्यांची कारकिर्द अक्षरशः गाजली…

अकलूज येथील तांबोळी,बागवान तसेच अन्य समाज घटकांकडून होणाऱ्या प्रत्येक समाज कार्यात दादाभाई तांबोळी हे हिरहिरीने सहभागी होऊ लागले…
राजकिय आणि सामाजिक कार्य करीत असताना पदे येतात जातात परंतु कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आपली समाज सेवा अखंडपणे सुरु ठेवणारा अकलूज येथील एक “अवलिया” म्हणजे दादाभाई तांबोळी यांची हि वेगळी ओळख समाज मनावर निर्माण झाली…
मुस्लिम समाज आणि अनावधानाने तांबोळी समाजातील प्रत्येक प्रश्न सोडविण्या संदर्भात दादाभाई तांबोळी यांनी कधी हि तडजोड केली नाही हे विशेष…

लगेच उपलब्ध होणारा कार्यकर्ता म्हणून दादाभाई तांबोळी यांच्या कडे पाहिले जाते,कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल अनेक संस्थांनी त्यांचा “गौरव” केला हे विशेष…
काल 06 जून रोजी तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दादाभाई तांबोळी यांचा 55 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,या वेळी अकलूज शहर मुस्लिम समाजातील सर्व समाज बांधवासह इतर समाज घटकातील मित्र मंडळी उपस्थित होते…माळशिरस तालुका मुस्लिम समाजाचे नेते ॲड वजीर शेख आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय असलमभाई सय्यद यांच्या हस्ते पार पडला…
या वेळी जावेद बागवान (मेंबर),हाजी जमीर चौधरी,राजू मोतीलाल (MM),टाइम्स 9 चे संपादक नौशाद मुलाणी,मनोज पोटे (सावकार),इन्नुस माढेकर,सहारा स्वा मिल चे सलीम शहाबुद्दीन सय्यद,मोहोते पाटील गटाचे कट्टर समर्थक दादा तोडकरी,महादेव नगरचे नाझीम खान,R P I चे किरण धाइंजे,प्रवीण साळवे,राहुल धाईजे,शिवाजी साठे,”युवक मित्र” जुल्करभाई शेख,तनवीर तांबोळी,”एकता” बहुउद्देशीय संस्थेचे जावेद (बाबा) तांबोळी,हिदायत (बाळासाहेब) सय्यद,रफिकभाई पठाण…टाइम्स 9 चे पत्रकार आमीर मोहोळकर,खलील तांबोळी आणि बुरुड समाजाचे युवक नेते महेश सूर्यवंशी,अजित धाइंजे,महावीर खंडागळे,गणेश साठे,लखन साळवे यांनी हि “कोहिनूर” दादाभाई तांबोळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…



