ग्रामविकास अधिकारी दिनकर पांडुरंग मोढवे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम.. अलोट उत्साहात व दिमाखदार

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवे पर्यटन स्थळी 11वर्षे कार्यरत असणाऱ्या आदर्श ग्रामविकास अधिकारी दिनकर पांडुरंग मोढवे यांचा सेवापुर्तीचा सोहळा पंचायतीचे मा. सरपंच ,उपसरपंच पंचायत समिती मा. सभापती ,पंचायत समिती सदस्य पदाधिकारी सर्वश्री विजय तांडेल, नितीन राऊत, सुनील राऊत, अरविंद वर्तक , भावना किणी ,भारती सावे , संतोष भुरकुड, तुषार पाटील यांच्यासह पंचायत कर्मचारी सर्वश्री संध्या ठाकूर, रितेश हाटकर, दर्शन पटेल, श्वेता घरत, अंकुश भंडार, मानसी गोरे, साहिल हाडळ, संदेश बेंदर यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दिमाखदार व अलौकिक स्वरूपात केळवे येथील मनःशांती फार्म हाऊसवर शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या स्थानी केळवे गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक पंचायतीचे माजी सरपंच विनोद (अण्णा) लक्ष्मण पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचा आरंभ पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत कार्यालयात सर्व माजी सरपंच, उपसरपंच ,पंचायत समिती मा. सभापती ,पंचायत समिती मा. सदस्य सर्वश्री श्रीमती भारती सावे, अरविंद वर्तक, भावना किणी, नितीन राऊत, विजय तांडेल, संतोष भुरकूड या पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी संध्या ठाकूर, रितेश हाटकर यांच्या संयोजनातून पार पडला. सकाळच्या सत्रात कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जुन्नर पंचायत समितीचे मा.सभापती सभापती दादाभाऊ बगाड, जुन्नर सरपंच परिषदेचे अध्यक्ष गोविंद साबळे हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आपली मनोगत व्यक्त करताना दिनकर मोढवे हे कसे शिस्तबद्ध नियमाशी सुसंगत धोरण आखणारे आणि केळवे गावचा रथ विकासाच्या दिशेने नेणारे उत्कृष्ट प्रशासक असल्याचे अवगत केले पंचायत कर्मचारी आणि मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना भावना अनावर होत होत्या पंचायत लिपिक संध्या ठाकूर यांनी मोढवे यांचा 11 वर्षाचा शिस्तबद्ध प्रशासकीय अनुभव व्यक्त केला तसेच ते कसे कडक शिस्तीचे होते त्याचप्रमाणे फणसासारखे अंतर्भागात गोड असल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटुन येत होता.
जुन्नरचे मा.सभापती बगाडसाहेब यांनी दिनकर मोढवे यांना शुभेच्छा देताना केळवे गावाची आठवण स्मरण आणि दायित्व या गावाच्या प्रेमापोटी कायम आठवणीत ठेवण्याबाबत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात उपसरपंच राजेश शालकर, माजी सरपंच अरविंद वर्तक, भावना किणी, भारती सावे, नितीन राऊत ,गोविद साबळे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमानंतर पंचायत सभागृहातून मुख्य रस्त्यापर्यंत सर्व ग्रामस्थ, संयोजक, नातेवाईक, आप्तेष्ट यांनी सेवापूर्ती कार्याची यथार्थ सांगता म्हणून दिनकर मोढवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर पुष्पवृष्टी केली. हा समारंभ केळवे ग्रामपंचायत इतिहासात अलौकिक स्वरूपात लक्षात राहील असा ठरला.
सेवापूर्ती व अभिष्टचिंतन समारंभ सायंकाळी मनःशांती रिसॉर्ट केळवे बीच या ठिकाणी श्रीमती भारती सावे, अरविंद वर्तक, भावना किणी, नितीन राऊत, विजय तांडेल, संतोष भुरकूड, सुनील राऊत, संध्या ठाकूर, रितेश हाटकर, दर्शन पटेल, श्वेता घरत, अंकुश भंडार, मानसी गोरे, साहिल हाडळ, संदेश बेंदर यांच्या उत्कृष्ट संयोजनातून चालू करण्यात आला. दीप प्रज्वलन अध्यक्ष व उपस्थित सर्व माजी सरपंच माजी उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला श्रीगणेश आणि सरस्वती यांचे पूजन करण्यात आले.व्यासपीठाच्या दर्शनीय भागात असलेल्या आपल्या माता-पित्यांच्या प्रतिमेस दिनकर मोढवे यांनी अभिवादन केले. व्यासपीठावर अध्यक्ष सह मान्यवरांना संयोजकाने निमंत्रित केल्यानंतर सत्कारमूर्ती मोढवे यांचे औक्षण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच सुनील राऊत यांनी केले प्रास्ताविकात ग्राम विकास अधिकारी मोढवे कसे कडक शिस्तीचे, नियमानुकुलित कामे पटकन करणारे, नियमांना बगल न देणारे, सत्वर सेवा देणारे सर्वांशी दिलखुलास वागणारे निर्भीड आणि कडक शिस्तीचे व्यक्तिमत्व आणि प्रशासक होते हे अधोरेखित केले त्याचबरोबर कुटुंब वत्सल होते हे सांगण्यास ते विसरले नाही 100 दिवस गुडमॉर्निंग पथक, आदर्श ग्रामविकास अधिकारी, गावाचा विकास ध्यास असणारा अधिकारी या त्यांच्या कर्तृत्वामुळे केळवे गाव स्वच्छतेच्या बाबतीत व विकासाच्या बाबतीत अग्रणी ठरले. पर्यावरण विकासरत्न, सागर तट अभियान, ISO ग्रामपंचायत, निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यासारख्या अभियानात त्यांनी नावलौकिक केल्याने त्यांना पारितोषिक ही मिळाले आहेत. या कणखर, कडक शिस्तीच्या आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव , अभ्यासू व्यक्तीमुळे ग्रामपंचायत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. मोढवे यांचा बुध्यांक स्मरणशक्ती अजब रसायन असल्याचा ही त्यांनी आवर्जून उल्लेख केला तल्लख बुद्धी आणि स्मरणशक्ती व निर्णयक्षमता या गुणांचा सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणात उल्लेख केला
मुख्य कार्यक्रमात गटविकास अधिकारी बापूसाहेब नाळे, भारती सावे, भावना किणी, अरविंद वर्तक, नितीन राऊत, सुनील राऊत, विजय तांडेल, हेमंत राऊत, संध्या ठाकूर, नेहा नयन मोढवे, संजय घरत, संजय खळदकर, नितीन पवार, अशोक राऊत, विठ्ठल झुंजार, भूषण सावे, नरेश सदाकाळ, साहित्यिक उमेश शिंदे, आदर्श शिक्षक अरविंद मोढवे, दिलीप चकवे, उमेश पालेकर, जितेंद्र राऊत, दादाभाऊ बगाड, गोविंद साबळे, पंकज पाटील, तुषार पाटील, अंकेश वडे मिलिटरी अधिकारी, अरविंद पाटील (कवी), तुळशीदास तांबे, अशोक नलावडे- सरपंच घोलवड या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून मोढवे यांचा जीवनपट उलगडला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास केळवे ग्रामस्थ, नूतन विद्या विकास मंडळ कार्यकारणी, शीतलाई देवी विश्वस्त मंडळ, हॉटेल असोसिएशन पदाधिकारी, लायन्स क्लब, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष उमेश पालेकर, विनोद म्हात्रे, ग्रामपंचायत कार्यकारणी, सर्व आजी माजी पदाधिकारी, नगर, जुन्नर ,मुरबाड,वसई , गुजरात या विविध भागातून आलेले मोढवे यांचे स्नेही व पंचायत समिती पालघर – अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी सर्व ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत चौधरी – जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेज, वाघ परिवार (अहिल्यानगर), धनाजी पवार सामाजिक कार्यकर्ते – मुरबाड ,रविंद्र शि.मोढवे .ज्ञानेश्वर मस्करे ,नयन मोढवे इ. बहुसंख्येने उपस्थित होते.
यथार्थ अर्थाने उत्साहात साजेसा नाविन्यपूर्ण सेवापूर्ती समारंभ पार पडला मात्र सेवापूर्ती झाल्याने सेवापूर्तीचा निरोप देताना उपस्थिताना तेवढेच वाईटही वाटत होते.
सेवानिवृत्तीचा असा समारंभ न भूतो न भविष्यती या उक्तीप्रमाणे साजेसा असल्याची भावना उपस्थितानी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ मार्गदर्शक मा. सरपंच विनोदअण्णा पाटील यांनी सांगितले की मोढवे यांनी यथार्थ कर्तव्य परिणीयता अबाधित राहून उत्कृष्ट प्रशासन चालवले, नियम कायदा याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत ते दक्ष राहिले म्हणूनच एवढा प्रदीर्घ कार्यकाळ त्याने सेवेचा केळवे येथे व्यतीत केला. केळवेचा विकास करण्यासाठी त्यांची असणारी धडपड, कामावरची निष्ठा, सार्वजनिक कामात झोकून देण्याची वृत्ती याची कमतरता निश्चित जाणवेल मोढवेसाहेबना भावी आयुष्यासाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
गट विकास अधिकारी पंचायत समिती पालघर सन्माननीय बापूसाहेब नाळे यांनी मनोगत व्यक्त करताना दिनकर मोढवे यांची कार्य करण्याची पद्धत, अभ्यासपूर्ण बोलणं याचा अनुभव पंचायत समिती सभागृहात ही सर्व पंचायत अधिकारी बांधव घेत होते, सडेतोड बोलणे, कामाची कुशलता त्यांच्या अंगी कॉलेज जीवनापासून असल्याचाही स्वअनुभव त्यानी सांगितला
सत्कारमूर्ती दिनकर मोढवे यांनी आपल्या मनोगतात केळवे वासियांनी दिलेली साथ, दिलेले प्रेम, सर्व माजी सरपंच, उपसरपंच, कार्यकारणी, विविध संस्था यांनी विकास कामात खंबीरपणे उभे राहण्याची दिलेली ऊर्जा, पंचायत कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान, त्यामुळेच नियम आणि तरतुदींना अधीन राहून हा अलौकिक क्षण अनुभवास मिळाला म्हणून सर्वांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाची सांगता युवा कार्यकर्ते वैभव हितेंद्र पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



