शैक्षणिक

महेक उमरफारुख बागवान (मोहोळकर) हिने मिळवले 10 वी च्या परीक्षेत उज्वल यश…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

“प्रतापगड” अकलूज चे कट्टर समर्थक रफिकभाई मोहोळकर यांची नात कु महेक उमरफारुख बागवान (मोहोळकर) हिने 2025 च्या फेब्रुवारी/मार्च महिन्यात झालेल्या एस एस सी बोर्डाच्या परीक्षे मध्ये 89.60 टक्के गुण मिळवत घवघवित असे यश संपादन केले…

कु महेक उमरफारुख बागवान (मोहोळकर) हिने मिळवलेले यश हे वाखाणण्याजोगे आहे,भविष्यात उच्च शिक्षण घेणार असल्याचे तिने टाइम्स 9 न्यूज चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी बोलताना सांगितले…

पुढे बोलताना ती असे हि म्हणाली की,माझ्या या यशा मध्ये आज्जी,आजोबा,आई,वडील,चुलते आणि भाऊ यांचा हि मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले…

अकलूज येथील बागवान समाजातील जेवढे विद्यार्थी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते त्या सर्व विद्यार्थ्या मधून पहिली येण्याचा मान महेक उमरफारुख बागवान (मोहोळकर) या विद्यार्थिनींनी मिळवल्याने अकलूज येथील बागवान समाजा सह सर्वच समाज घटकातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे…

पुढील शिक्षणासाठी घरातील सर्व मंडळीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे हि तिने शेवटी सांगितले,तिने मिळवलेल्या या यशाने मात्र उमरफारुख बागवान (मोहोळकर) यांचे वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button