महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शर्मापोलिस महासंचालक पदकाने सन्मानित…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालघर पोलिस दलामार्फत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सफाळे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र सुभाष शर्मा यांना पोलिस महासंचालक पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे.

02 जून 1999 साली महेंद्र शर्मा हे ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर भरती झाले होते.सध्या ते पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता. के. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.महेंद्र शर्मा यांनी बोईसर, विरार, वालीव व सफाळा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी यांचे रायटर म्हणुन काम केलेले आहे.

बोईसर, विरार, वालीव व सफाळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, जबरी चोरी, बलात्कार हया गुन्हयांमध्ये अथक प्रयत्न करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

शर्मा यांनी आतापर्यंत मालमत्तेचे एकुण 48 गुन्हे उघडकीस आणुन गुन्हयातील गेलेला माल 100 टक्के हस्तगत केलेला आहे. तसेच खुन, खुनाचा प्रयत्न असे एकुण 13 गंभीर गुन्हे उघडकीस आणुन आरोपींविरुध्दच्या एकुण 12 गुन्हयांमध्ये त्यांना शिक्षा ठोठावण्यात यश आलेले आहे. त्यांच्या या निष्कलंक कर्तबगारीमुळे त्यांना आतापर्यंत एकूण 101 पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button