शहर

पालघर मध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून निषेध आंदोलन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी पालघर शहर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील जामा मशिदेच्या बाहेर दुपारी 2 वाजता शुक्रवारची नमाज पठण केल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सम्पूर्ण देशात संतापाची लाट आली आहे. ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. त्याअनुषंगाने पालघर मध्ये ही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी हातावर काळे फीत बांधून पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांप्रति श्रद्धांजली अर्पण करत आपलं दुःख व्यक्त केल. या दरम्यान ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ व ‘पाकिस्तान वर कारवाई करा व गुन्हेगारांना शिक्षा द्या” इत्यादी घोषणा ही देण्यात आल्या तसेच पाकिस्तान देशाचा राष्ट्रध्वज फाडून पेटवण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button