महाराष्ट्र

सातारा शहरातील लोकांना घरपट्टी मध्ये 50 टक्के सवलत द्यावी…

🎯 उबाठा सेनेचे उप जिल्हा संघटक आणि बागवान राहत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे सचिव सादिकअली बागवान यांनी दिला आंदोलनाचा इशारा…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

राजधानी सातारा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी त्याच बरोबर सातारा ची दुसरी ओळख म्हणजे “पेंशनर” सिटी,इथला व्यापारी,नोकरदार वर्गे हा मध्यम राहणीमान असलेला आणि मुबंई – पुणे सारखा नाही पण जेमतेम पगार आणि व्यापारातून,व्यवसायातून कमवणारा वर्ग…

सातारा नगर परिषदेचा वार्षिक कर काही दिवस पुढे मागे का होईना पण भरणारी येथील सर्वच वर्गातील जनता आणि याच कर स्वरूपत जमा झालेल्या निधी मधून होणारा सातारा शहराचा विकास,सुशोभीकरण इत्यादी…

मागील 4 तारखेला सातारा नगर परिषदेचे वार्षिक अर्थ संकल्प साधारण पणे 642 कोटी 99 लाख रुपयांचा सादर पालिकेचे मुख्यधिकारी साहेब यांनी केला आता प्रश्न निर्माण होतो कि सातारा नगर परिषद हे मा.मुख्याधिकारी साहेब चालवितात का तर त्याचे उत्तर आहे नाही आणि सध्या पालिकेवर्ती “आका” ची म्हणजेच अलीबाबा ची आणि त्यांच्या टोळीतल्या चोरांची ( ठेकेदारांची )पकड आहे आणि त्यामुळे मा.मुख्याधिकारी साहेब “लाचार” झाले आहेत का..?असा प्रश्न पडतो आहे…

आज रोजी बघितले तर वार्षिक बजेट मधून होणारी विकास कामे बघता म्हणजेच “राजवाडा” येथून “कमानी हौद” पर्यंत मागच्या वर्षी बसवीनेत आलेले “ऐतेहासिक दिवे” कि जे आज रोजी 50% बंद परिस्थितीत आणि काही अर्धे बंद आणि अर्धे चालू अश्या स्थितीत आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून आज त्या ऐतेहासिक पोल ची अवस्था गंभीर आहे आणि विशेष म्हणजे यावर पालिकेतील कोणत्याही कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्यांचे लक्ष नाही बंद झालेले दिवे मागील चालू करण्यासाठी कोणतेही पावले मागील चार महिन्यांपासून उचलेली दिसत नाहीत…

अतिशय निकृष्ठ दर्जाची खरेदी झालेली असल्याचे निष्पन्न होत आहे म्हणजेच करोडो रुपयांवर कोणी ताव मारला याची चौकशी तर सोडा पण संबंधित ठेकेदाराला जब सुद्धा विचारला गेला नाही याला जवाबदार कोण…?

त्याच प्रमाणे दुसऱ्या एका कामात सुद्धा कित्येक लाख किंवा करोड मुख्याधिकारी साहेब यांनी “आकाच्या” आदेशाने पाण्यात घालाविले आहेत…? असे दिसून येत आहे ते दुसरे काम म्हणजे सातारा नगर परिषद हद्दीत प्रत्येक घरावर,दुकानावर,अपार्टमेंट मध्ये कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी बसविलेले “कयू आर कोड” ज्या हेतूने ते बसविलेले होते तो हेतू पूर्ण होताना दिसत नाही नव्याचे नऊ दिवस म्हणी प्रमाणे कचरा गाडी वाल्यानी काही दिवस स्कॅन केले पण नंतर बऱ्याच प्रभागात स्कॅन करताना दिसून येत नाहीत यात ही मोठ्या प्रमाणात बजेट मधील निधी वाया गेलेल्याचे दिसून येत आहे…

काही वर्षा पूर्वी बऱ्याच चौका चौकात अपघात होऊ नयेत म्हणून गोलाकार काचेचे स्टॅन्ड उभे करण्यात आले यात ही कित्येक लाखाचा निधी वापरला गेला पण आज रोजी त्याची अवस्था पाहता तो निधी पाण्यात गेला.
अश्या प्रकरची कित्येक लाख करोडो रुपयांची उधळण करणाऱ्या पालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांनी दुसरी कडे पालिका कर भरणाऱ्या सातारा नगर परिषद हद्दीतील गाळा मालक आणि घरमालक यांना 50% कर सवलत देऊन बाकी काय उधळण पट्टी करायची आहे ती करावी
सोमवारी या आशयचे निवेदन मी मा.मुख्याधिकारी साहेब यांना देणार आहे आणि त्यांनी 50% सवलतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा नाहीतर नगर परिषद कार्यालयात या बेहिशोभी उधळण पट्टी विरोधात जन आंदोलन उभारणार…

सादिकअली अमीर बागवान (सर)
उपजिल्हा संघटक,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सचिव,बागवान राहत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button