शहर

सफाळे आगरवाडी शारदा भवन शाळेच्या (1981)च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

सफाळे भागातील पूर्वीचे शारदा भवन प्रशाला आगरवाडी व सध्याचे लोकनायक जयप्रकाश विद्यालय आगरवाडी या शाळेच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा रविवारी लोकनायक जयप्रकाश आगरवाडी शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिक्षकांच्या पत्नींचा हळदी कुंकवाचा समारंभ तसेच शाळेतील वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांसह स्कॉलरशिप मध्ये उत्तीर्ण कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सर्व उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षकांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवप्रतिमेला नतमस्तक होऊन वंदन केले तसेच जयप्रकाशजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक वाद्याने व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व हयात नसलेल्या माजी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

व उपस्थित आजी-माजी शिक्षकांच्या पत्नींचा हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला व सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला भेट म्हणून लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच देण्याचे आश्वासन दिले व या शाळेतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना कैलास वासी वासुदेव शेष ( गुरुजी ) यांच्या स्मरणार्थ नितीन शेष यांच्या मार्फत शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देण्यात आली तसेच स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना रवींद्र वर्तक राहणार चटाळे यांच्या मार्फत स्टूडेंट ऑफ द इयर एलआयसी ट्राफि आणि सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेहसंमेलन मेळावा मोठ्या थाटामाटात साजरा केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button