शहर

आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाळे पूर्व विभागात विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

सफाळे पूर्व विभागातील दहिसर तर्फे मनोर,साखरे, नावझे , दारशेत या गावांमध्ये आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि ग्रामविकास विभागांतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी सफाळे पूर्व भागात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी या विभागातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच आणि नागरिकांशी संवाद साधत गावांतील अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या या भूमिपूजनाच्या सोहळ्याला आमदार राजेश पाटील यांच्या सह

पालघर जिल्हा परीषद समाज कल्याण माजी सभापती विष्णू कडव,जिल्हा परिषद सदस्य दिनकर नाईक,तालुका अध्यक्ष नागेश पाटील,जिल्हा सरचिटणीस दिलीप गायकवाड,सचिन आक्रे, व सफाळे पूर्व विभागातील सर्व सरपंच उपसरपंच यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button