पश्चिम रेल्वेचे सफाळे रेल्वे फाटक बंद… बघा या महिलेचा पराक्रम.. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे जीव धोक्यात घालून ही महिला करते रेल्वे फाटक क्रॉस

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
रेल्वे प्रशासनाला ठाम विरोध मी याच सफाळे रेल्वे फाटकाचा वापर करून पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी आणि माझ्या दैनंदिन कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सफाळे रेल्वे फाटकाचा वापर करेन तुम्ही कितीही रस्ता अडवा मी सात समुद्र पार करेन पण सफाळे रेल्वे फाटकातूनच प्रवास करेनं याबाबतचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक लोखंडी जाळ्या लावून बंद केले असताना देखील या लोखंडी जाळ्यांवरून चढून हा रेल्वे फाटक क्रॉस करताना ही सफाळ्यातील एक महिला आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे रेल्वे फाटक क्रॉस करून पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे.

अशी बिकट परिस्थिती असताना देखील रेल्वे प्रशासन, सरकार आणि स्थानिक राजकीय पुढाकारि, नेते खासदार आमदार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत म्हणूनच या महिलेने याबाबत कोणाकडे तक्रार करण्यापेक्षा स्वबळावर लोखंडी जाळ्यावर चढून हा रस्ता क्रॉस करून मी याच सफाळे रेल्वे फाटकाचा वापर करेन रेल्वे प्रशासनाला दाखवून देईन की या रेल्वे फाटका शिवाय आम्हाला दुसरा मार्ग नाही प्रशासनाने हा रस्ता बंद करू नये हे दाखवून देण्यासाठीच तिने रेल्वे प्रशासनाने लोखंडाच्या जाळ्यांनी बंद केलेला रेल्वे फाटक जाळ्यांवर चढून क्रॉस करून याच रेल्वे फाटकाचा वापर जाण्या येण्यासाठी करावा असे आवाहान सफाळे वासीयांना केले आहे.
पश्चिम रेल्वेचे सफाळे रेल्वे फाटक बंद करण्यात आल्यामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.रेल्वे प्रशासनाचा हा मनमानी कारभार आता हा या भागातील नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. सफाळे भागातील 60 गावातील नागरिकांना आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी या सफाळे रेल्वे फाटकातूनच प्रवास करावा लागतो असे असताना देखील रेल्वे प्रशासनाने 1 एप्रिल 2025 पासून हा फाटक बंद करून पर्यायी रस्ता उपलब्ध न करून दिल्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी पूर्व-पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे फाटक हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्यामुळे सफाळे रेल्वे फाटक बंद करू नये असे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी दिले असताना देखील रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध न करून देता सफाळे रेल्वे फाटक 1 एप्रिल रोजी बंद केले आहे.यामुळे या भागातील नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप जनक प्रतिज्ञा व्यक्त केल्या जात असून रेल्वे प्रशासनाविरुद्ध सफाळे विकास कृती समिती आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.



