हाजी फैज अकबरभाई बागवान यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…

🎯 सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूरचा निवडणुक कार्यक्रम जाहीर,अनेक रथी महारथी रिंगणात राहण्याचे संकेत…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूकी साठी सिद्धेश्वर मार्केट यार्ड फ्रूट अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष हाजी फैज अकबरभाई बागवान यांनी आडते व व्यापारी मतदारसंघातून अर्ज दाखल केला असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात २५ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शुक्रवारी दिनांक 28 मार्च रोजी हाजी फैज अकबरभाई बागवान यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला…
प्रशासकीय कार्या साठी सर्वच समाज घटकातील लोकांना सहकार्य करणारे आणि त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे हाजी फैज अकबरभाई बागवान यांनी मार्केट यार्ड निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सबंध अडत व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे…
हाजी फैज अकबरभाई बागवान हे स्वतः व्यापारी असुन सोलापूर शहर बागवान जमियत बैतूल माल च्या माध्यमातुन त्यांनी अनेक गोर गरीब लोकांना सहकार्य केले असल्याने त्यांचा लोकांच्या गराड्यात राहून जनहिताची कामे करणारा माणूस अशी ओळख निर्माण झाली आहे,म्हणूनच लोकं त्यांना निवडून देण्यासाठी प्रथम प्राधान्य देतील असे सध्या तरी वाटत आहे…
हाजी फैज अकबरभाई बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर सुचक म्हणून हाजी अहमद तांबोळी तर अनुमोदक म्हणून हाजी युसुफ मेमन यांच्या स्वाक्षरी असल्याची माहिती सोलापूर शहर बागवान जमियत चे संचालक अशपाक मेंबर यांनी दिली,या वेळी हाजी उस्मान (U G),हाजी मूसा माडीवाले,शोएब शेठ(JAB),मुजमिल बागवान,सोहैल बागवान,अशफाक मेंबर यांच्या सह बहुसंख्य अडत व्यापारी उपस्थित होते…
अर्ज दाखल करते वेळी सोलापूर शहर सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील अनेक व्यापाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती हे विशेष,या वेळी बोलताना हाजी फैज अकबरभाई बागवान असे म्हणाले की,व्यापारी संघटनेने अधिकृतरित्या संधी दिल्यास दिलेल्या संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले…



