महाराष्ट्र
धनगर वाड्यावर जाऊन ध्रुव प्रतिष्ठानने केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल
भोर तालुक्यातील गरीब व हुशार मुलांची दखल सातत्याने ध्रुव प्रतिष्ठान घेत असून दरवर्षी या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे.
गेल्या 23 वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यावर्षी डोंगराळ व दुर्गम भागातील 2000 गरीब व हुशार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात टीटेघर गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील धनगर वाड्यावर जाऊन ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी केली.



