मनू ऐवजी सुपीक डोक्याच्या केसरकराच्या विचाराचाच शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करावा, दशरथआण्णा कांबळे यांची केसरकरावर प्रखर टीका

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी, ज्या मनुस्मृतीने माणसाचे माणुसपण व जगण्याचे अधिकार हिरावून घेतला. अशा अन्यायकारी मनुस्मृतीचे दहन आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी केले. आणि संपुर्ण बहुजन समाजाला मनुच्या कायद्यातुन सोडविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अशा मनुस्मृतीला परत एकदा शालेय पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातुन, विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीच्या सवयी आणि शिक्षण देण्याचा जणू विढा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर याने घेतलेला दिसून येतो. त्यामुळे मनुच्या विचारांना चांगले म्हणत, त्या विचारांना पाठ्यपुस्तकात आणणाऱ्या सुपीक डोक्याच्या केसरकराचेच महान विचार पाठ्यपुस्तकात छापून आले पाहिजेत. अशा प्रकारची टिका शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी केली आहे.

पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, ज्या मनुस्मृतीने माणसाचे माणुसपणच हिरावून घेतले. त्याचप्रमाणे कोणत्याही समाजातील महिलांना फक्त दुय्यम दर्जाचे स्थान दिले. महिला हि फक्त उपभोगाचे साधन समजले, तिला चुल आणि मुल या व्यतिरिक्त कोणता ही अधिकार दिला नाही. मनुस्मृतीने फक्त वर्णव्यवस्थेलाच आधारभुत मानुन, तीच जीवन जगण्याची पद्धती बनविली. आणि याच वर्णव्यवस्थेला धरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला होता.
छत्रपती शाहु महाराजांसोबत सुद्धा याच मनुस्मृतीमुळे वेदोक्त प्रकरण घडले होते. या सर्वांचा बदला म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. त्याचप्रमाणे कित्येक शतके फक्त काही जातींवर अमानूषपणे अत्याचार करण्यात आले. हि सर्व मनुस्मृतीची शिकवण पाहता, शालेय अभ्यासक्रमात ह्या मनुस्मृतीच्या श्लोकांचा किंवा इतर काही बाबींचा समावेश करुन, परत एकदा बाबासाहेबांनी तह हयात ज्या मनुस्मृतीला विरोध करुन माणसाला माणुसपण मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. अशा मनुस्मृतीला जीवंत करण्यासाठी मनुचा वंशज दिपक केसरकर तोंड वर काढू पाहत आहे.
परंतु केसरकरला आम्ही एकच इशारा देणार आहोत, मनुला मानणाऱ्या केसरकर सारख्या पिलावळीने गळ्यात गाडगं, पाठीला झाडू, अंगावर कोणती ही वस्त्र न घालता, कसल्याच प्रकारची संपत्ती धारण न करता तसेच सर्व अधिकार विहिन तुम्ही फक्त दहा वर्षे जगुन दाखवावे! परत मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचा विचार करावा. अन्यथा तुमच्या सारख्या मनुच्या अवलादिना येत्या काळात आम्ही सोलापूर जिल्हा बंदी करणार हे मात्र नक्की!!! अशा प्रकारचा कडक इशारा यावेळी दशरथआण्णा कांबळे यांनी दिला आहे.