चळवळीतील मित्र जुल्कर शेख यांच्या वाढ दिवसानिमीत्त…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
जुल्कर शेख अकलूजच्या मुस्लिम चळवळीतील मोलाचं योगदान असणारे नांव,त्यांच्या वडिलांचे निधन झाले अन् कौटुंबिक जबाबदारीच ओझ लवकरच त्यांच्या खांद्यावर येऊन पडलेलं…
घरची परिस्थिती बेताची तरी हि सामाजिक बांधिलकी जपत हळु हळु चळवळी मध्ये सामील झालेला युवक अशी ओळख मिळवण्यात मात्र यशस्वी ठरला,सुरुवातीला धवलसिंह युवा मंच आणि तद्नंतर जनसेवेचा हि पाईक ठरला…

आणि याच माध्यमातुन माझे आणि जुल्कर शेख यांच्या बरोबर स्नेहाच नाते कधी जुळले ते कळलेच नाही,त्यांच्या बरोबर अनेक ठिकाणी प्रवास हि झाला,त्यांच्यातला हजरजबाबी पणा,मुद्देसूद बोलण आणि प्रत्येक क्षेत्रातील अचंबित करणारी माहिती या मुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आलेली झळाळी लपून राहिलीच नाही…
छोटा जावेद,पत्रकार गोपाळ लावंड, पत्रकार करडे,वाजीदभाई यांच्या सह जितका जिव्हाळा तितकाच इतरांसोबत ठेवणारा दोस्ती च्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे जुल्कर शेख…
आज जुल्कर शेख यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देताना मला मनस्वी आनंद तर आहेच परंतु मुस्लिम समाजाच्या चळवळीतून नावारूपास आलेल्या जुल्कर शेख यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मानाचे स्थान मिळो हीच अपेक्षा…



