पालघर जिल्ह्यातील सफाळे शिलटे पाडा गावातील 11 वर्षीय मुलाचा खदानी मध्ये बुडून मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील सफाळे शिलटे पाडा ग्रामपंचायत हद्दीतील एका 11 वर्षीय लहान मुलाचा पाण्याने भरलेल्या दगडी खदानी मध्ये बुडून मृत्यू झाला आहे.
ही घटना सोमवारी सकाळी शिलटे पाडा गावात घडली आहे.
सफाळे पश्चिमेला असलेल्या शिलटे पाडा गावातील यज्ञेश जयेश तुमडे वय वर्ष 11 हा इयत्ता 5 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता शाळेला सुट्टी असल्या कारणामुळे आपला जुळा भाऊ आणि त्याचे मित्र यांच्यासोबत शिलटे पाडा गावातील काजू बागेजवळ असलेल्या दहा ते पंधरा फूट खोल पाण्याने भरलेल्या दगडी खदानी मध्ये पोहण्यासाठी गेले होते.

यज्ञेश तुमडे यांनी या खदानी मध्ये सर्वात आधी वरून उडी मारल्यावर तो पाण्याखाली गेल्यावर वर आलाच नाही म्हणून त्याचे सर्व मित्र व भाऊ यांनी या बाबत घरी येऊन सांगितल्यावर ग्रामस्थांनी याबाबत सफाळे पोलिसांना माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी व सफाळे पोलिसांनी या खदानी मध्ये शोध घेतला असता यज्ञेश तुमडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला मृतदेह सापडला याबाबत सफाळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूचे नोंद केली आहे.



