स्त्रीचे समाजात आदर्शवत स्थान आहे.-सौ.मिनाक्षी जगदाळे.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क1
स्त्रीचे समाजात आदर्शवत स्थान आहे असे मत पश्चिम महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्रा.मिनाक्षी जगदाळे यांनी लाटेवस्ती(महाळूंग) शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सौ.भक्ती नाचणे होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.अप्सरा अस्लम मुलाणी यांनी केले.

यावेळी बोलताना प्रा.मिनाक्षी जगदाळे म्हणाल्या की,
ज्याला आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा कृष्ण झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली
तो सीतेचा राम झाला अशा प्रकारे स्त्रीचे समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे.महिलांविषयींचे कायदे आणखी सक्षम होण्याची गरज आहे.आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे ही कौतुकाची बाब आहे.महिलांचा सन्मान राखणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे.

यावेळी सौ.श्रध्दा जवंजाळ यांनी महिलांचे आरोग्य व कर्करोग या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
माजी मुख्याध्यापिका सौ.सय्यद मॅडम यांनी स्रीयांचे हक्क व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी शाळेच्या वतीने पाककला, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला,बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
चंदूकाका सराफ अॅण्ड सन्स यांनी मदत केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री दिलीप उकिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.सविता गायकवाड, सौ.स्वाती लाटे, श्रीम.वनीता कुदळे,व महिलांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ.रेहाना तांबोळी यांनी केले.



