महाराष्ट्र

8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला कामगार संघटनेच्या परिषदेत “क्लारा झेटकीन” यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची हाक दिली आणि तेव्हापासून दरवर्षी 8 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय महिला दिन” म्हणून साजरा केला जातो.

जगभरातील लोक गेल्या शतक भराहून हि अधिक काळा पासून “8 मार्च” हा दिवस “आंतरराष्ट्रीय महिला दिन” म्हणून साजरा करतात.लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरुकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे…

पण हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे? या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली? हे जाणून घेऊयात…

आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD) हा कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झाला.1908 मध्ये 15,000 महिलांनी कामाचे तास कमी व्हावेत,चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा हक्क मिळावा या मागण्यांसाठी न्यूयॉर्क शहरात एक मोर्चा काढला होता.

वर्षभरानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीनं लगेचच पुढच्या वर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय महिला दिन’ म्हणून घोषित केला.

त्यानंतर “क्लारा झेटकिन” यांनी 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली.”क्लारा झेटकिन” या जर्मन कम्युनिस्ट आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या होत्या.या दिवसाला एक आंतरराष्ट्रीय सोहळा बनवण्याची कल्पना त्यांचीच होती…

8 मार्च जागतिक महिला दिन म्हणजेच “ती” चा दिवस,ती म्हणजे “आई”,ती म्हणजे “बहीण”,ती म्हणजे मुलगी,ती म्हणजे अर्धांगिनी आणि ती म्हणजे मैत्रीण…

त्याच्या साठी शिक्षणाची सुरुवात कधी का होइना पण आयुष्यातली सगळ्यात प्रथम गुरू हि आईच असते,हे त्रिवार सत्य…एखाद्या मातीच्या ओल्या गोळ्याला “कुंभार राजा” जसे घडवतो तसा तो मातीचा ओला गोळा घडत जातो आणि एका परिपक्व वस्तू मध्ये त्याची गणना होते,आपले हि तसेच आहे,हिंदी भाषेत तर एक प्रख्यात म्हण आहे “मां की गोद हि बच्चो का पहला मदरसा है” आणि तो बच्चा तिन्ही जगाचा स्वामी असला तरी “आई” विना मात्र भिकारी आहे…

आता “ती” बहीण म्हणजे सबंध घरादाराची एक प्रकारे शान च,भले तुम्हीं अनेक भावंड असु देत परंतु तुमच्या समारंभात “ती” च्या शिवाय शोभा नाही,जरी “ती” तुमच्या कुळात जन्मलेली असली तरी नावाला ती पाहूणीच मात्र तुमच्या सुख दुःखाची एक प्रकारे कारभारणी आणि तुमच्या घराची इज्जत देखील…

“ती” तशी दुसऱ्या कुळातील तरी देखील तुमची अर्धांगिनी,तुमचं हवं नव्हं ते करणारी,तुमच्या वंशाच्या दिव्याला जन्म देणारी तरी ती हमेशा साठी परकी ती परकीच,आपल घर सोडून आलेली आणि तुमचं अख्ख घर सांभाळणारी शेवटी “ती” म्हणजे तीच असते…

आता “हि” म्हणजे आपली,”हि” म्हणजे मुलगी,याचा जन्म झाल्यावर अनेकांनी मुलगा का झाला नाही म्हणून कोसली गेलेली तरी सुध्दा वंशाचा पसारा वाढवत नेणारी,वेळ प्रसंगी तुमच्या संसाराच्या गाड्याला ओढण्यासाठी मदत करणारी,याच्या पायात जरी काटा रुतला तरी वेदना न जाणवू देणारी “ती” म्हणजे मुलगी…

आता “हि” म्हणजे मैत्रीण,तुमच्या वर वेळ कशी हि येवो हक्काने ज्याच्या खांद्यावर डोके ठेऊन मन मोकळे करून व्यक्त होण्याचे ठिकाण असणारी ती मैत्रीण मात्र सर्वांना हवीहवीशी च वाटणारी का असावी…? असा मात्र प्रश्न नक्कीच पडतो…

तुम्हाला समृद्ध जीवन आत्मसात करायचे असेल तर या सर्व तुमच्या आयुष्यात असणे देखील महत्वाचे,8 मार्च हा जागतिक महिला दिन तर साजरा होतोय तरी देखील एक दिवस वरील उल्लेख केलेल्या “त्या” सर्वांचा आहे आणि का असू नये…? या मताचा मी तरी आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button