करुणा मुंडे यांचीच भविष्यवाणी अखेर खरी ठरली…

🎯 आकाच्या “आकांना” अखेर राजीनामाच द्यावा लागला…!
आमीर मोहोळकर
प्रतीनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सरकारच्या डोक्याचा विचार आता न केलेलाच बरा,कारण करुणा मुंडे यांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरली असुन सत्तेचा प्रवास आता असंवीधानिक व्यक्तींच्या विचाराने सुरु असल्याचे दिसून येत आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने घातक परिणाम कारक ठरणार आहे…
आज सकाळ पासून महाराष्ट्रातल्या विधी मंडळात ज्या घडामोडी घडून आल्या त्या सर्व घडामोडी कशाच्या द्योतक आहेत हे लक्षात घेतले पाहिजे,मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मनोजभाई जरांगे पाटील यांची भेट घेताच अश्रूंना करून दिलेली मोकळी वाट मन हेलावून टाकणारी आहे…
सोशल मीडिया ने मयत संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे जे फोटो प्रसारीत केले आहेत ते फोटो कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप अनावर केल्या शिवाय राहणार नाही.ते फोटो पाहताना किती क्रूरपणे ती हत्या झाली असावी याचा अंदाज येतो.ती घटना आणि त्यातील क्रौर्य प्रचंड अस्वस्थ करणारे आणि माणूसकीला काळीमा फासणारे आहे…
याप्रकरणी ज्या शक्तींचा वारंवार उल्लेख होत आहे त्या शक्तींवर कारवाई झालीच पाहिजे.उभा महाराष्ट्र आज देशमुख कुटुंबीयांच्या न्याय्य मागणीच्या मागे ठामपणे उभा आहे.मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे ही महाराष्ट्रातील जनतेची भूमिका आहे.मुख्यमंत्री महोदयांनी जनभावना लक्षात घेऊन जनतेला आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे…
महाराष्ट्राचे राजकारण एक वेगळीच वाट धरू पाहत आहे हे जरी विचाराधीन घेतल्यास भविष्यात देखील आणखी काही घडामोडी अशा प्रकारे घडतील की जनता विचारात पडल्या शिवाय राहणार नाही…
महाराष्ट्र कात टाकतोय की काताचा महाराष्ट्र झालाय हे कळेना असे झाले आहे,जनता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पाखरा सारखी वाट बघतेय हे मात्र तितकेच खरे…
आमदार सुरेश (अण्णा) धस यांच्या भाषेत बोलायचं झाल्यास आता “आका” बरोबर आका च्या “आकांना” मयत संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या गुन्ह्यामध्ये सामील करून घ्यावे,अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी पुढे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकेच खरे…



