महाराष्ट्र

एका जमान्यातील “विनोदाचा हुकमी एक्का” विठ्ठल साळुंखे यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

माझे वडील ज्येष्ठ रंगकर्मी स्व युसुफ मोहोळकर यांचे अत्यंत जवळचे मित्र असणारे आणि माझ्या वडिलांच्या निधनानंतर आम्हां तिघा भावंडांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे विठ्ठल साळुंखे (आप्पा) यांना वाढ दिवसाच्या निमित्ताने अनेक शुभेच्छा…

दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा… ज्येष्ठ रंगकर्मी स्व युसुफ मोहोळकर आणि विठ्ठल साळुंखे (आप्पा) या जोडगोळीने अनेक वर्षे आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली,विठ्ठल साळुंखे (आप्पा) यांच्या बद्दल लिहावे एवढा मोठा तर मी नक्कीच नाही परंतु मला भावलेली त्यांच्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांचा हजरजबाबी पणा…

अकलूज टेंभूर्णी परिसरा सह सबंध सोलापूर जिल्ह्यावर या जोडगोळीने अक्षरशः फक्त लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले,मला आठवतंय ज्येष्ठ रंगकर्मी स्व युसुफ मोहोळकर हे प्रती निळू फुले म्हणून प्रसिध्द झाले तर विठ्ठल साळुंखे (आप्पा) यांना लोकं विनोदाचा बादशहा च म्हणायचे…

कला क्षेत्रात काम करत असताना या जोडगोळीने “लोकनेते” प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या बरोबर असणारी नाळ कधी तुटू दिली नाही,हि गोष्ट खरी आहे की,दो हंसो का जोडा अखेर बिछड हि जाता है,अगदी तसेच ज्येष्ठ रंगकर्मी स्व युसुफ मोहोळकर यांच्या निधना नंतर विठ्ठल साळुंखे (आप्पा) यांच्या दोस्तीची ताटातूट झाली…

विठ्ठल साळुंखे आप्पांना वाढ दिवसाच्या निमित्ताने अनेक शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button