शहर

पालघर पोलीस दल महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम … 7 कलमी कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी…मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सन्मान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

महाराष्ट्र राज्यामध्ये 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत 7 कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
या 100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांमध्ये वेबसाईट, सुकर जीवनमान, स्वच्छता,, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षत्रिय कार्यालयांना भेटी असे या कार्यक्रमांमध्ये महत्वाचे उपक्रम आहेत या पहिल्या पन्नास दिवसांच्या आढाव्यात पोलीस विभागातील पालघर जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या अनुषंगाने गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सदर 7 कलमी कार्यक्रम पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, व अंमलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या राबविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button