सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचा पदाधिकारी नियुक्ती सोहळा थाटामाटात संपन्न…

🎯 सोलापूरच्या जे के बागवान आणि आसिफ बागवान (बन्सीलाल) यांच्या सह मोहोळच्या जावेद बागवान यांचे राष्ट्रवादी मध्ये जोरदार स्वागत…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचा अल्पसंख्यांक विभागाचा शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांचा “पद नियुक्ती” सोहळा जूनी मिल कंपाऊंड येथील “राष्ट्रवादी भवन” येथे आज पक्षाचे अल्पसंख्यांक प्रमुख “आमदार” इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडला…
सदर कार्यक्रमाच्या व्यासपिठावर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी चे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांच्या सह कार्याध्यक्ष जुबेर बागवान,सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष आमीर शेख,अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजीव मोरे,फारुख मडके उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करणारे पक्षाच्या अल्पसंख्यांक ग्रामीणचे अध्यक्ष नजीर भाई इनामदार हे हि आवर्जून उपस्थित होते…

सदर कार्यक्रमा प्रसंगी “बागवान राहत फाऊंडेशन” च्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठी सामाजिक चळवळ उभी करणारे जे के बागवान आणि आसिफ बागवान (बन्सीलाल) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करत मोठी जबाबदारी हि खांद्यावर घेतली,मोहोळच्या जावेदभाई बागवान यांच्या वर पक्षाने सोलापुर जिल्हा “कार्याध्यक्ष” पदाची जबाबदारी सोपवत मोठा विश्वास दाखवला…
बागवान राहत फाऊंडेशन चे अध्यक्ष जे के बागवान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या शहर “सचिव” पदी तर बागवान राहत फाऊंडेशन चे जॉइंट सेक्रेटरी आसिफ बागवान (बन्सीलाल) यांची शहर “सरचिटणीस” पदी निवड करण्यात आली…
जे के बागवान,आसिफ बागवान (बन्सीलाल) आणि मोहोळ च्या जावेदभाई बागवान यांच्या निवडीने सबंध सोलापूर जिल्ह्याच्या बागवान समाजातून आनंद व्यक्त करण्यात आला…

टाइम्स 9 शी बोलताना जे के बागवान म्हणाले की,बागवान राहत फाऊंडेशन च्या माध्यमातून बागवान समाजासह अल्पसंख्यांक समाजाची जी चळवळ उभी केली त्या चळवळीचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी काम करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अल्पसंख्यांकां साठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले…
मोहोळचे जावेदभाई बागवान असे म्हणाले की,पक्षाने जी जबाबदारी माझे वर सोपवली आहे ती इमाने इतबारे पार पाडत अल्पसंख्याक समाजासाठी भरीव कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले…

आसिफ बागवान (बन्सीलाल) म्हणाले की,माझ्या सारख्या युवा कार्यकर्त्यावर जुबेरभाई बागवान,नजीरभाई इनामदार यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहून पक्षाचे ध्येय धोरण अल्पसंख्यांक समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले…
या पद नियुक्ती सोहळ्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून अल्पसंख्यांक समाजातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती,नजीर भाई इनामदार यांनी शेवटी आभार व्यक्त केले…



