सोनापंत दांडेकर शिक्षण मंडळ लॉ कॉलेज पालघर मधील विधी विषयाची पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाला शैक्षणिक भेट..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सोनापंत दांडेकर शिक्षण मंडळ लॉ कॉलेज मधील प्रथम व तृतीय वर्षात एलएलबी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या समूहाने कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पायल चौरेला यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका डॉ.उत्कर्षा जुन्नरकर व प्राध्यापिका दीप्ती नाईक यांनी विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली.
या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कायद्याची अंमलबजावणी आणि न्यायालयीन व्यवस्थेसोबतच्या सहकार्याची व्यावहारिक माहिती देणे हा होता.
भेटीदरम्यान पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन गुन्हेगारी तपास प्रक्रिया आणि न्याय टिकून ठेवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या विविध पैलूंबाबत माहिती दिली. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पालघर पोलीस दलाच्या वेबसाईट बाबत माहिती देण्यात आली. पालघर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी पोलीस खात्यातील यंत्रणा व त्यातील विभाग शहरी व ग्रामीण याचे पदानुसार वर्गीकरण याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देऊन भावी वकील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सायबर गुन्हे शाखेच्या अधिकारी रूपाली (गुंड) वर्तक यांनी सायबर गुन्हे विषयी महत्वपूर्ण माहिती व चित्रफित दाखवून सायबर गुन्हे रोखण्यासाठी समाजात कशाप्रकारे मदत करू शकतो याबाबत मोलाचे मार्गदर्शन करुन संवादात्मक सत्र साधून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कायदेशीर उत्तरे देऊन समाधान नोंदवले.
याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांसोबत असलेल्या कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ.उत्कर्षा जुन्नरकर व दीप्ती नाईक यांनी विद्यार्थ्यांना शिकण्याची मौल्यवान संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व त्यांच्या विभागाचे आभार मानले.
अशा भेटी आमच्या विद्यार्थ्यांना कायद्याच्या अंमलबजावणीचे व्यावहारिक परिणाम समजून घेण्यास व कायदेशीर व्यवसायात भविष्यातील भूमिकांसाठी तयार करण्यास मदत करतात कायद्याच्या विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाचा संधी उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही असेच शैक्षणिक भेटीगाठीचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
या भेटीचा समारोप पोलीस कार्यालयातील विविध विभागांच्या फेरफटकांनी झाला तेथे विद्यार्थ्यांनी प्रकरण कसे नोंदवली जातात तपास कसा केला जातो व कसे व्यवस्थापित केले जाते याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले विद्यार्थ्यांनी न्यायव्यवस्थेतील पोलिसांच्या भूमिकेबाबत सखोल कौतुक केले.