महाराष्ट्र

भीमा नदीकाठचा विद्युत प्रवाह सुरळीत करा युवा सेनेची मागणी. अन्यथा जनावरे अकलूजच्या महावितरण कंपनीमध्ये बांधू युवा सेना प्रमुख – गणेश इंगळे

प्रतिनिधी रियाज मुलाणी मो 9921500780

भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडले असल्यामुळे नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे शेतातील पिके जळून चाललेली आहेत भीमा नदीचे पाणी ओज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी अजून दहा दिवस लागणार आहेत या दहा दिवसांमध्ये उरलेसुरली पिके ही जळून जातील त्यामुळे तात्काळ भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा युवा सेनेच्या वतीने अकलूज मधील महावितरण कंपनीमध्ये जनावरे आणून बांधण्याचा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिला.

युवा सेना सचिव वरून सरदेसाई, विभागीय सचिव अक्षय ढोबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख उत्तम आयवळे, यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, उपजिल्हाप्रमुख सोनूभैय्या पराडे- पाटील, तालुकाप्रमुख सुभाष काकडे, उपतालुकाप्रमुख दत्ता साळुंखे, यांच्या उपस्थितीत अकलूज महावितरण कंपनीचे अधिकारी अण्णासाहेब काळे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी चंदूनाना पराडे,गणेश भिताडे, लावा पराडे,ओम पराडे,अक्षय पराडे, विकास भोई,आप्पा भोई,तुषार राऊत, निखिल देशमुख,अर्जुन लोखंडे,अक्षय नाईकनवरे,अविराज पराडे,माऊली पराडे,अविनाश पराडे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button