काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कामगीरी. आरोपींकडून चोरीस गेलेले ०१ दुचाकी वाहन व घरफोडी मधील चोरी केलेला मुद्देमाल असा एकुण २,४७,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त”

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो.9921500780
काळेपडळ पो.स्टे. गु.रजि.नं.१६६/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसमांबाबत पो.अं. शाहीद शेख व पो.अं. महादेव शिंदे यांना त्यांचे खबऱ्यामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दाखल गुन्हयातील आरोपीत इसम सुनिल परशुराम अरदाऊर, वय १९ वर्षे, धंदा-मजुरी, रा. म्हाडा बिल्डींग, हडपसर, पुणे मुळ रा. शांतीनगर स्कुल जवळ, विजापुर, कर्नाटक व प्रकाश रमेश काळे, वय १९ वर्षे, रा. म्हाडा बिल्डींग, हडपसर, पुणे, मुळ रा. दक्षिण सोलापुर, जि. सोलापुर यांचे नमूद दाखल गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांस दाखल गुन्हयात अटक करून त्यांचेकडे तपास करता त्यांनी चोरी केलेले दुचाकी वाहन हे त्यांचे मुळ गावी कर्नाटक राज्यामध्ये विकले असल्याचे सांगितले. तरी नमूद आरोपीसह कर्नाटक राज्यात जावून तेथे तपास करून एक रॉयल इनफील्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल एच.१२ डब्लु एच. ३०५२ किंमत अंदाजे २,४०,०००/- रुपये हे वाहन हस्तगत केले आहे. तसेच नमूद इसमांकडे अधिक तपास करता. त्यांनी यापुर्वी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडुन सदर घरामध्ये चोरी केली असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने काळेपडळ पोलीस ठाणेकडील गु.रजि.क्र.२४५/२०२५ बी.एन.एस. कलम ३०५.३३१ (२) प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उघडकिस आले असून नमूद दाखल गुन्हयातील दोन इण्डेन कंपनीचे भरलेले घरगुती वापराचे गॅस सिलेंडर किंमत अंदाजे ५०० रुपये व रोख रक्कग २५००/- रुपये आरोपीत इसम यांचे कडुन वरील बोन्ही गुन्हे हे उपउकिस आणून एकुण २.४७.५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून काळेपडळ पोलीस ठाणे कडील दोन गुन्हे उघडकिस आणलेले आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर यांचे मार्ग दर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग, पुणे शहर, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस हवालदर प्रविण काळभोर, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.



