अकलूजच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला शिवबाबांच्या नेतृत्वाची गरज…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पासून सुरु झालेला अकलूजच्या राजकारणाचा ऐतिहासिक वारसा “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या बंधू सह चोख पणे जोपासत अवघ्या महाराष्ट्राला राजकारणाचा “अकलूज पॅटर्न” दाखवून दिला…
गेल्या दहा वर्षांपासूनचा विचार केल्यास अकलूज आणि परिसराचा विकासाच्या अनुषंगाने कायापालट करणारे “युवा नेते” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्व कौशल्यामुळे युवा पिढी अक्षरशः भारावून गेलेली पहायला मिळाली…
“अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील,”जाणते राजे” जयसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नंतर कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे नेतृत्व म्हणजे शिवतेजसिंह मोहिते पाटील…
अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्याच राजकारणाची स्थिरता धोक्यात आलेली असताना या परिस्थिती मध्ये शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्व कौशल्याची गरज अखंड सोलापूर जिल्ह्यातील जनतेला पुरक ठरणार आहे हे मात्र तितकेच खरे…

सोलापूर जिल्हाच सध्या राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळे विविध पक्षांच्या गटबाजीने ग्रासला गेला असुन या मुळे युवकांमध्ये आलेली मरगळ झटकून टाकायची वेळ आल्याने शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व हे “शिवधनुष्य” सहजपणे पेलून दाखवतील असा अंदाज राजकारणातील अनेक “प्रकांड पंडित” व्यक्त करत आहेत…
शिवतेजसिंह मोहिते पाटील या नावाने जसे अकलूज येथील सार्वजनिक विकासाला यशो शिखरावर नेऊन सोडले अगदी तशीच अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील युवकांना देखील असुन भविष्यात प्रगतीचे “आधारस्तंभ” शिवतेजसिंह मोहिते पाटील हेच असु शकतात…
शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूजने उत्तुंग विकास साधला,या मध्ये शिक्षण,आरोग्य तसेच पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेली दिशा ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.त्यांच्या संयमी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे अकलूजने नेहमीच एकसंध राहून प्रगती केली…
विधानसभेच्या मत मोजणी प्रक्रिये नंतर राजकारणापासून थोडेसे अलिप्त झालेले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या गैरहजेरीत विरोधक चेकाळून गेलेले असताना बाबांची झालेली “धडाकेबाज” एंट्री विरोधकांना धडकी भरवणारी ठरली आणि उडून गेलेली पाखरे पुन्हा एकदा बाबांच्या नेतृत्त्वाखाली जमू लागली हे विशेष…
अकलूज सह सोलापूर जिल्ह्यातील जनतेची ही भावना आहे की,शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात जोमाने उडी मारून आपले नेतृत्व गुण चौफेर उधळावे…

या वेळेस आमदारकी गमावलेले सांगोल्याचे शहाजी बापू पाटील असो किंवा शिंदे बंधू असो यांना “जोर का झटका धीरे से किसने दिया है”…! हे विचारले तर सोलापूर जिल्ह्याचा युवक नेतृत्वाचा प्रश्न कायमचा सुटून जाईल…
अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हि जवळ आल्याने सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा “राजबिंडा” चेहरा म्हणून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेणे महत्वाचे ठरणार आहे कारण जनता अकलूजची असो,माढा ची असो किंवा करमाळ्याची असो शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हंटले की,विषय संपला…
शिवतेजसिंह (बाबा) मोहिते पाटील यांना वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा…
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



