शिवजयंतीनिमित्त फस्ट स्टेप प्ले सफाळे स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जयघोष

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील फस्ट स्टेप प्ले स्कूलच्या नर्सरी आणि केजीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त पारंपारिक वेशभूषा परिधान करून सफाळे बाजारपेठेतून रॅली काढून शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला.
फस्ट स्टेप प्ले स्कूल या शाळेत नर्सरी आणि केजीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या विषयांसोबतच भारतीय संस्कृतीतील विविध सणउत्सव आणि धार्मिक कार्यक्रम देखील वर्षभर साजरे केले जातात.
बुधवार 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती निमित्त शाळेला सुट्टी असल्याने मुख्याध्यापिका पुष्पा जोशी यांनी शाळेतील शिक्षकांना मंगळवारी शिवजयंती साजरी करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्व शिक्षकांनी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे अशा वेशभूषा परिधान केल्या.
तसेच शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकच जयघोष करीत शाळेपासून ते थेट सफाळे बाजारपेठ अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुख्याध्यापिका पुष्पा जोशी, शिक्षिका मानसी पाटील, सानिया मोहिते, कृतिका मोहिते, साक्षी पाटील, प्रांजल मोरे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



