महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील सफाळे मुस्लिम प्रिमियर लिग स्पर्धा उत्साहात संपन्न…..एस.के स्टार रायडर्स संघ प्रथम विजेता..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640

सफाळे येथील क्रिकेटप्रेमींनी 15 व 16 फेब्रुवारीला सफाळे येथील भव्य मैदानावर मुस्लिम समाजातील खेळाडुंसाठी मर्यादित पाच षटकांची स्पर्धा आयोजित केली होती.

इरफान शेख,रिद्वान शेख,सिकंदर शेख,हाजी शेख, रफीक शेख, जमील शेख, हाजी इब्राहिम व इक्बाल शेख ‌या आठ क्रिकेट शौकीनांनी आपल्या इरफान रॉयल,रिद्वान टायटन, एसके स्टार रायडर्स,एवन हाजी आरटीओ, रफीक ग्लेडिएटर्स,जेकेवारियर्स,हाजी इब्राहिम फायटर्स व इक्बाल एस.आर.किंग या संघांसाठी निवडलेल्या खेळाडुंमध्ये ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविली गेली त्यामुळे प्रत्येक संघाला तीन तीन सामने खेळून आपलं खेळातलं नैपुण्य दाखविण्याची संधी लाभली.सामन्यातील जीत/गुण संख्या विचारात घेऊन उपांत्य फेरीत गेलेल्या एसके स्टार रायडर्स,रिद्वान टायटन, हाजी इब्राहिम फायटर्स व रफीक ग्लेडिएटर्स या चार संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने होऊन अंतीम सामना एसके स्टार रायडर्स व रिद्वान टायटन या दोन संघात खेळविण्यात आला व त्यात सिकंदर शेख यांच्या एसके स्टार रायडर्स संघाने विजेतेपद तर उप विजेतेपद रिद्वान शेख यांच्या रिद्वान टायटन संघाने पटकावले.रणजीपटू राजेश सुतार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

किशोर पाटील,जितू पाटील व अक्रम शेख यांची पंचगिरी निर्दोष तर नितीन पाटील यांचे सामन्याचे धावते समालोचन ओघवते होते.पंकज सूर्यवंशी यांनी धावसंख्या लेखनाचे काम बिनचूक केले तर डिका स्पोर्ट्स ने सामन्याचे थेट प्रक्षेपण घराघरात नेऊन पोहोचविले.राष्ट्रगीताने सामन्याचा प्रारंभ, सफाळे गावातील पोलिस व डाक्टर्स यांच्यातील प्रदर्शनीय सामना, ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देण्यासाठी मान्यवरांचे वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत, शिस्तबद्ध व नीटनेटके आयोजन व महिलांची उपस्थिती लक्षवेधक होती.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरुवाती पासून शेवट पर्यंत डॉ.नावेद शेख,तौसिफ शेख,नईम शेख,रिद्वान शेख,इरफान शेख,आरिफ पटेल,वसीम बाबू शेख, शोएब जमादार ,जाबीर जमादार इत्यादींचा खूप मोठा सहभाग होता.समाजासाठी यथाशक्ती काहीतरी करण्यासाठी परस्परांचा सहवास, संवाद,संपर्क,सातत्य आणि संघटन आवश्यक असतं.आमची ही पहिलीच स्पर्धा ही सुरुवात असून आमचं कार्यक्षेत्र केवळ खेळापुरतं सिमीत न ठेवता परस्पर सहकार्य व संमतीने समाजातील दुर्बल घटकांसाठी ते विस्तारीत करणार असल्याचा मनोदय समन्वयक डॉ.नावेद शेख यांनी व्यक्त केला व स्पर्धेची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button