कल्याणच्या अल् तौहीद एज्युकेशन कॉन्फरन्स साठी बागवान राहत फाऊंडेशनचे जॉइंट सेक्रेटरी आसिफ बागवान (बन्सीलाल) होणार रवाना…

🎯 सदर कॉन्फरन्स मध्ये बागवान राहत फाऊंडेशन चे जॉइंट सेक्रेटरी आसिफ बागवान (बन्सीलाल) यांचा होणार भव्य दिव्य सत्कार…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अल् तौहीद एज्युकेशन सोसायटी कल्याण,मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या एज्युकेशन कॉन्फरन्स साठी सोलापूर येथुन बागवान राहत फाऊंडेशन चे अध्यक्ष जे के बागवान आणि बागवान राहत फाऊंडेशन चे जॉइंट सेक्रेटरी आसिफ बागवान (बन्सीलाल) रवाना होणार असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…
सबंध महाराष्ट्रातील बागवान जमातीच्या संपर्कात असणारा एक उदयोन्मुख युवा समाज सेवक आसिफ बागवान (बन्सीलाल) यांचे अत्यंत निकटचे सहकारी असलेले इम्रान बागवान (कल्याण,मुंबई) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले…

या एज्युकेशन कॉन्फरन्स साठी महाराष्ट्रातून हसन मुलाणी (मुंब्रा मुंबई),एहसान सैयद (मुंबई),जाहिद सर (मुंब्रा मुंबई),समद बागवान (औरंगाबाद),जे के बागवान,सोलापूर (अध्यक्ष बागवान राहत फाऊंडेशन),सादिकअली बागवान (सातारा),शकील बागवान (भिवंडी मुंबई),रफीक नायाब (बीड OBC Expert),डॉ वसीम बागवान
(औरंगाबाद),जावेद बागवान (पुणे बागवान समाज अध्यक्ष),इरफान सर (सोलापुर बागवान टाइम्स),ॲड मुकरम बागवान (औरंगाबाद),रशिद बागवान (कोल्हापूर),जावेद बागवान (अक्कलकोट) हे विशेष प्रतिनिधी हि उपस्थित राहणार असल्याची माहिती आसिफ बागवान (बन्सीलाल) यांनी दिली…
कल्याणच्या अल् तौहीद एज्युकेशन सोसायटीने सदरची कॉन्फरन्स आयोजित केली असुन या मध्ये अल्पसंख्यांक समाजातील मुले आणि मुली यांच्या शैक्षणिक क्षेत्राशी निगडित समस्या वर विचार विमर्श होणार असल्याची माहिती आसिफ बागवान (बन्सीलाल) यांनी दिली…
सदरचा एज्युकेशन कॉन्फरन्स कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 4 : 30 ते रात्री 8 : 00 या वेळेत राज टॉवर,ओल्ड फिश मार्केटच्या जवळ,गव्हमेंट हॉस्पिटल च्या शेजारी,कल्याण (वेस्ट) येथे होणार आहे…