लातूर शहर बागवान जमातीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हाजी शब्बीर रहेमान बागवान यांचा विजय…

🎯 155 मतांनी प्रतिस्पर्ध्यावर मिळवला विजय…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आज दिनांक 16/02/2025 रोजी लातूर शहर बागवान जमातीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला,या मध्ये एकूण 997 मतांचे पोल झाले होते त्यापैकी हाजी शब्बीर बागवान यांना 567 मते प्राप्त झाल्याने त्यांचा विजय घोषित करण्यात आला…
अध्यक्ष पदा साठी उभे असलेले दुसरे उमेदवार रफिक बागवान यांना 412 मते प्राप्त झाली तर रद्द मते 18 झाल्याचे सुत्रांनी सांगितले,सकाळी आठ वाजता सुरु झालेली मतदान प्रक्रिया दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती…

155 मतांनी विजय घोषित करण्यात आलेले हाजी शब्बीर बागवान यांच्या अनुयायांनी एकच जल्लोष करत त्यांना शुभेच्छा दिल्या,या वेळी लातूर शहर बागवान जमातीचे सर्व सदस्य उपस्थित होते…

टाइम्स 9 चे अकलूज शहर प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी हाजी शब्बीर रहमान यांना भ्रमण ध्वनी वरून शुभेच्छा दिल्या,या वेळी बोलताना ते म्हणाले की,भविष्यात लातूर शहर बागवान जमातीचे विकासाच्या अनुषंगाने पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले…