ताहेरा फाऊंडेशनने केला “त्या” दोन युवतीचा यथोचित सन्मान…

🎯 साजिया तांबोळी आणि साजिदा मुल्ला यांनी उंचावली अकलूज नगरीची शान…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज, मराठी अकलूज
9890299499
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या अकलूज नगरी येथील सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर असणाऱ्या “ताहेरा फाऊंडेशन” या संस्थेने आज MPSC मार्फत “महसूल सहाय्यक” (Revenue Assistant) पदी नियुक्ती झालेल्या साजिया अ रशिद तांबोळी यांचा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या “अन्न सुरक्षा अधिकारी” या पदावर नियुक्ती झालेल्या साजिदा अ रशिद मुल्ला या दोन्हीं मुलींचा यथोचित सन्मान केला…

या वेळी साजिया तांबोळी आणि साजिदा मुल्ला यांच्या आई वडिलांचा हि गौरव “ताहेरा फाऊंडेशन” मार्फत कऱण्यात आला,”ताहेरा फाऊंडेशन” चे अध्यक्ष हाजी अबुबकर तांबोळी आणि या संस्थेचे खजिनदार हाजी असलमभाई तांबोळी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला…

टाइम्स 9 शी बोलताना रिटायर्ड पोस्ट मास्टर अ रशिद मुल्ला साहेब म्हणाले की,सबंध महाराष्ट्रात रँक 65 पैकी 06 रँक ओबीसीतून घेत साजिदा मुल्लाने हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले…

ताहेरा फाऊंडेशन चे अध्यक्ष हाजी अबुबकर तांबोळी यांच्या निवास स्थानी अत्यंत छोटेखानी समारंभात अन् खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यासाठी हाजी युसुफभाई तांबोळी,मुलाणी सर,इन्नुस तांबोळी सर,बागवान सर,पत्रकार हुसेन मुलाणी यांच्या सह टाइम्स 9 चे संपादक नौशाद मुलाणी आणि अकलूज शहर प्रतिनिधी आमीर मोहोळकर उपस्थित होते…