दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच राहणार, करमाळ्या बरोबर माढा तालुक्यातील छत्तीस गावेही संजयमामाना नाकारणार :पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच राहणार, करमाळ्या बरोबर माढा तालुक्यातील छत्तीस गावेही संजयमामाना नाकारणार असा हल्लाबोल प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या गावभेट दौऱ्याचा आढावा सांगत असताना दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या बाबत अधिक सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले कि महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना संपूर्ण 244 करमाळा विधानसभा मतदार संघात प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
अनेक गावी पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत नारायण आबा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे मात्र विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या विरोधात करमाळा तालुक्याप्रमाणेच माढा तालुक्यातील छत्तीस गावांतही नाराजीचा मोठा सूर उमटताना बघायला मिळत आहे. या भागातील मतदार हे सोशल मीडिया वर विद्यमान आमदारांच्या निष्क्रियते बद्दल बोलत आहेत.
विद्यमान आमदार संजयमामा हे छत्तीस गावांत गेल्यावर करमाळा तालुक्यात मला मोठा प्रतिसाद आहे असे खोटे सांगत आहेत तर करमाळा तालुक्यात आल्यावर मला छत्तीस गावांत मोठी आघाडी मिळणार असे सांगत आहेत. परंतु वस्तुस्थिती पहिली तर दोन्ही भागातील जनतेने संजयमामा यांना नाकारले असल्याचे दिसून येते. मतदार संघात अशी अवस्था असताना राज्यपातळीवर फारसे वेगळे चित्र नाही. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही फसवण्याचे काम विद्यमान आमदार संजयमामा यांनी केल्याने आता उमेदवारी मागताना महाविकास आघाडी व महायुती या दोघांनीही दारे बंद केली आहेत.
यामुळे संजयमामा शिंदे यांचेवर अपक्ष उभारण्याची वेळ आली आहे. तर संजयमामा यांनी मध्यन्तरी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात केलेल्या ढवळाढवळीचा फटका त्यांचे बंधूना सहन करावा लागत आहे. यामुळे करमाळा मतदार संघात कधी तरी अवसे पौर्णिमेच्या दिवशी येणारा हा दोन्ही घरचा पाहुणा निवडणुकीत मतांच्या बाबतीत उपाशीच राहणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील हे वीस हजाराहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी होतील असा आत्मविश्वास प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केला आहे.



