आता वाढलाय माझा भावम्हणून बदललंय माझं नाव म्हणत्यात सारे मला टोमॅटो राव

कवियत्री
नूरजहाँ फकृद्दीन शेख गणेशगांव ता.माळशिरस जि.सोलापूर
आता वाढलाय माझा भाव
म्हणून बदललंय माझं नाव
म्हणत्यात सारे मला टोमॅटो राव
बातम्यात झळकतय माझं गाव
आता वाढलाय माझा भाव .
थेंब थेंब पाणी पाजून मला जगवलं
रक्ताच पाणी करून मला वाढवलं
पोटच्या लेकरावानी मला पोसलं
पण मी शेतकऱ्याला लई रडवल.
गाऱ्हाणं आमचं आता देवानं ऐकलं
किती वेदना झाल्या असतील
रस्त्यावर फेकून आम्हाला देताना
कष्टाचं फळ मातीत गाडताना
लाल चिखल पाहून आमचा रडताना
कर्जाच्या ओझ्याखली दबून मरताना
आठवा ह्या गोष्टी महागाई वाढली म्हणताना .
हसतोय बळीराजा हसु द्याकी राव
कांदोबाला पण आमच्यासारखे
दिवस लवकर येऊं द्या की राव.
हरतोय नेहमीच जुगाराचा डाव
आता तरी त्याला जिंकू द्या की राव
डोळे पुसून हसतोय बळीराजा
हसू द्या की राव .
सप्न साकार त्याची होतायत
होऊन द्या की राव .

कवियत्री
नूरजहाँ फकृद्दीन शेख
गणेशगांव
ता.माळशिरस जि.सोलापूर