शहर

कोंकण विभागीय अधिस्विकृती समितीवर हर्षद पाटील यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अर्चना शंभरकर यांच्यातर्फे शुभेच्छा

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

कोंकण विभागीय अधिस्विकृती समितीवर अधिस्विकृतीधारक पत्रकार हर्षद पाटील यांची राज्य शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांचे स्वागत जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी अर्चना शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनामार्फत त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शंभरकर यांनी शुभेच्छा दिल्या. श्री हर्षद पाटील हे झी 24 तासचे जिल्हा प्रतिनिधी असून गेल्या अनेक वर्षापासून ते पालघर जिल्ह्यातून झी 24 तास साठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून पालघर जिल्ह्यात कार्यरत आहेत.

यावेळी साप्ताहिक पालघर मित्रचे संपादक पंकज राऊत, दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी निरज राऊत, दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी सचिन जगताप, दैनिक पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश तावडे, दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी संजय सिंह, दैनिक लोकसत्ताचे निखिल मेस्त्री, व आकाशवाणीच्या प्रतिनीधी निता चौरे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button