महाराष्ट्र

करमाळा विधानसभेसाठी बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख

करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज (सोमवारी) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी आमदार श्यामल बागल, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे आदी उपस्थित होते.

बागल यांनी पदयात्रेच्या माध्यमातून येत करमाळा तहसील कार्यालय येथे अर्ज दाखल केला. यावेळी उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘दिग्विजय बागल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘कोण म्हणतं येत नाही आल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणू गेला. यावेळी प्रत्येक गावातून निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, पोथरेचे हरिश्चंद्र झिंजाडे, सतीश नीळ, आशिष गायकवाड, गणेश झोळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button