क्रीडा

अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजनगट कुस्ती स्पर्धा-२०२३ अकलूज

टाइम्स 9 मराठी न्युज

ता.१९ अखिल भारतीय ‘त्रिमुर्ती चषक’ कुस्ती स्पर्धेत टाकळीचा कालिचरण सोलनकर ‘त्रिमूर्ती’ चषकाचा मानकरी तर कण्हेरचा वैभव माने उपविजेता ठरला.

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज व महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती शंकरनगर-अकलुज यांचे वतीने दि.१७,१८ व १९ फेब्रुवारी या कालावधीत ‘शिवतीर्थ आखाडा, यशवंतनगर’ येथे सुरु असलेल्या ४४ व्या त्रिमुर्ती चषक कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातील अंतिम स्पर्धेत टाकळीच्या कालीचरण सोलणकर व कन्हेरच्या वैभव माने या मल्लांमध्ये अत्यंत चुरशीची व रोमहर्षक लढत होऊन अंतिम क्षणी २ गुणाने टाकळीचा कालिचरण सोलणकर हा ‘त्रिमूर्ती चषकाचा’ मानकरी ठरला. तीन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धेच्या ‘त्रिमूर्ती चषकाचे’ वितरण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते पाटील, स. म.साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मा.श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, भाजपाचे जिल्हा संघटक मा. श्री.धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज च्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, युवानेते मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे बाद पद्धतीने अत्यंत शिस्तीने पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे बारामती, पंढरपूर, फलटण, आटपाडी, म्हसवड, कुर्डुवाडी, खवासपूर, टेभूर्णी, सराटी, कंदर,जेऊर, माळशिरस, सदाशिवनगर, नातेपुते, खुडूस, वाफेगांव, अकलूज आदी ठिकाणाहून ६५२ पैलवानांनी तर स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या त्रिमूर्ती चषक’ या खुल्या गटासाठी ६२ पैलवानांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रकूल स्पर्धेचे विजेते राम सारंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे पार पाडले.

१ डिसेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत स. म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व जयंती समितीचे अध्यक्ष मा. श्री. मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील व परदेशातील मल्लांमध्ये त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धेचे व लावणी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी वाढीव भरघोस बक्षीसांची रक्कम याप्रसंगी जाहीर करण्यात आली.

यास्पर्धेस भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, अमर देशमुख, विजयकुमार देशमुख, किसनराव वाघ, नितीन निंबाळकर, विराज निंबाळकर, विठ्ठलराव ताटे देशमुख,सतीश शेंडगे, मल्लसम्राट रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, नामदेव ठवरे, ऑल इंडिया चॅम्पियन पै. कमाल जमादार, पै. सिकंदर शेख, स.म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामभाऊ सावंत, सर्व संचालक, स्पर्धा प्रमुख वसंत जाधव, मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, सचिव पोपट भोसले-पाटील, सदस्य, नरेंद्र धुमाळ,अरविंद वाघमोडे, खंडाप्पा कोरे, दादा कोकाटे, उमेश भिंगे व नियोजनातील सर्व समिती प्रमुख, सदस्य, सयाजीराजे मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेचे खास ग्रामीण शैलीतील धावते समालोचन मल्लसम्राट रावसाहेब मगर व राम सारंग यांच्या टीमने केले.

स्पर्धेतील विविध वजन गटातील त्रिमूर्ती चषकाचे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते

२५ कि.
संग्राम जाधव रुई
मनोज गोरड, गोरडवाडी
२८ कि.
आदित्य सावंत, इंदापूर
अधिराज चव्हाण, पंढरपूर
३० कि.
सुजल गोरड, खुडूस
प्रसाद जाधव, भाळवणी
३२ कि.
हर्षवर्धन पवार, खुडूस
शिवम निंबाळकर, फलटण
३५ कि.
राजवीर मोरे, अकलूज
पृथ्वीराज चव्हाण, आटपाडी
४० कि.
प्रणव हिमने, शिरसवाडे
तुषार कडू, म्हसवड
४५ कि.
यशराज मोरे, अकलूज
योगेश गायकवाड, पानिव
५० कि.
विवेक सातपुते, म्हसवड
प्रज्योत माने, फलटण
५५ कि.
विशाल सुरवसे, खुडूस
अजय पवार, माळशिरस
६० कि.
विशाल रूपनवर, म्हसवड
अभिजित मोटे, खुडूस
६५ कि.
विकी कडे, नातेपुते
रामेश्वर गाडे, खुडूस
७० कि.
किरण राणे, नातेपुते
गणेश गाडे, खुडूस
७५ कि.
संदेश शिंपकुले, फलटण
पांडुरंग केदार, पंढरपूर
८० कि.
किरण माने, जेऊर
गौतम शिंदे, विहाळ
८५ कि.
अविनाश गावडे, सराटी
विश्वशरण सोलणकर, टेंभुर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
05:24