करमाळा येथील एसटी आगारात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
राज्य परिवहन करमाळा आगारात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी करमाळा आगारातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने नियोजन केले होते. यामध्ये करमाळा बसस्थानकावर मोठा मंडप उभारण्यात आलेला होता. याप्रसंगी आगाराच्या आगारप्रमुख अश्विनी किरगत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमत होता. यावेळी मुख्य उत्सवमुर्तीचे पूजन करण्यात आले.

तसेच करमाळा बसस्थानक, चालक वाहक विश्रांतीगृह, आगार व्यवस्थापक कार्यालय येथील महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत, सहाय्यक वाहतूक अधीक्षक संजय कदम, वाहतुक निरीक्षक पंकज जाधव हे उपस्थित होते. तसेच यावेळेस महेश भोसले, शहाजी वीर,प्रवीण पवार, महेश गाडे, नाना नलावडे, ईश्वर सावंत, भाऊसाहेब नलावडे, नाना शिंदे, विजय कटके, दिलीप घोडके, सज्जन इंगळे, साजिद शेख, जयकुमार कांबळे, शिवानंद बिराजदार, सुरक्षा रक्षक – संजय सूर्यवंशी इत्यादी सर्व कर्मचारी हजर होते. सदर जयंती निमित्त आगारामध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रीकांत गोमे, अभिजित पाटील, सज्जन इंगळे, सचिन माने आदींनी परिश्रम घेतले.




