महाराष्ट्र

अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचा “मुस्लिम” समाजाकडून सन्मान…

आमीर मोहोळकर 

प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज 

9890299499

ईद उल फित्र निमित्त अकलूज येथील निरा नदी काठी असलेल्या ईदगाह मैदानाचे कलर काम आणि तेथील परिसर स्वच्छता उत्कृष्ट रितीने करून घेतल्याबद्दल अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने अकलूज नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांचा सन्मान करण्यात आला…

तसेच यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने विविध अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली,यावेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेबां कडून मुस्लिम समाजाच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासित कऱण्यात आले… 

यावेळी मुक्तारभाई कोरबु,साजिदभाई सय्यद, जुल्कर (भैय्या) शेख,मोहसिन शेख,जावेद (खुद गब्बर) बागवान समिर काझी,आदम शेख,तनविर पठाण,अब्बास भाई शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button