महाराष्ट्र

करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

करमाळा तहसील कचेरी मधील कर्तव्यदक्ष तसेच हुशार महसूल अधिकारी तसेच गोरगरिबांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे निवासी नायब तहसीलदार माजिदभाई अब्दुल वहाब काझी हे आपल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले नायब तहसीलदार माजिदभाई काझी यांनी त्यांच्या सेवेच्या कारकीर्द मध्ये बार्शी, सोलापूर, माढा, मोहोळ व करमाळाआदि तहसील कार्यालयामध्ये उत्कृष्ट व कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी म्हणून सेवा बजावली गोरगरिबांचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी त्यांच्या महसूल प्रशासनाच्या कारकीर्द मध्ये सर्व समाजाचे तसेच राजकारण विरहित म्हणून उत्कृष्ट व आदर्श कामकाज केले आहे सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा करमाळा येथील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते त्यांचा निरोप समारंभामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी महसूल प्रशासनातील बहुसंख्य अधिकारी कर्मचारी वर्ग करमाळा तालुक्यातील गावा गावातील विविध गावचे सरपंच राजकीय नेते पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती

गोरगरिबांचा अधिकारी म्हणून त्यांची करमाळा तहसील मध्ये प्रसिद्धी होती त्यांनी त्यांच्या कारकीर्द मध्ये तहसील कचेरीतील सर्वसामान्य तसेच गरजू नागरिकांचे अनेक विविध प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत तहसील कचरीमध्ये कोणताही सर्वसामान्य नागरिक कधी आपल्या कामानिमित्त तहसील कचेरी मध्ये आला तर प्रथमता तो नायब तहसीलदार माजिदभाई काझी यांच्याकडे जात होता काझी देखील त्यांच्या प्रश्नाचे त्वरित निराकरण करत होते गरीब सर्वसामान्य गांजलेल्याचे अडीअडचणी ते सोडत होते

अशा या गोरगरिबांचा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कर्तव्यदक्ष हुशार अधिकाऱ्याला महसूल प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभामध्ये त्यांना त्यांच्या भावी कारकीर्द साठी शुभेच्छा दिल्या निरोप समारंभामध्ये अनेक राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, महसूल क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी काझी यांचे कारकीर्द मध्ये केलेल्या स्वच्छ व पारदर्शी कामाचा आढावा दिला ऐसा अधिकारी महसूल प्रशासनामध्ये होणे नाही अशा शब्दात काही नागरिकांनी निरोप समारंभामध्ये काझी यांना शुभेच्छा दिल्या एकंदर पाहता करमाळा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार काझी यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साह वातावरणात पार पडला

गरिबांच्या मदतीला धावून येणारा महसूल अधिकारी रिटायर झाला गोरगरिबांच्या मदतीला नेहमीच धावून येणारा महसूल अधिकारी म्हणजे नायब तहसीलदार माजिदभाई काझी होय काझी हे महसूल कार्यालयातील गोरगरिब व दिन दुबळ्यांचे कैवारी असून त्यांनी त्यांच्या प्रशासकीय कालखंडामध्ये कधीही प्रशासकीय कामकाज करीत असताना गरिबांना अडवले नाही उलट त्यांचे कामे युद्ध पातळीवर केले आहे असा हा अधिकारी रिटायर होणे म्हणजे चांगल्या अधिकाऱ्याची कमतरता म्हणावी लागेल तेव्हा साहेबांनी प्रशासकीय दरबारी आणखीन मुदतवाढ घेऊन गोरगरिबांच्या सेवेसाठी पुनश्च एकदा कामकाजाला सुरुवात करावी

नसरुल्ला खान, शेतकरी

आवाटी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button