शहर

गौरी गणपती च्या आरास मध्ये हि भावी आमदार शिवबाबा यांची क्रेझ पहायला मिळत आहे…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

आपल्या इकडे गणपती उत्सव म्हणजे सार्वजनिक असतो,गणपतीचे उत्साहात स्वागत केल्यानंतर वेध लागतात ते गौरी च्या आगमनाचे,आज गणपतीच्या भेटी साठी बहिण गौरी चे हि स्वागत झाले…

श्रीपूर येथील कट्टर मोहिते पाटील समर्थक आणि माढा तालुक्याचे भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी बजरंग भोसले यांच्या घरी हि गणपती सह गौरी ची आस्थापना झाली…

गौरी गणपती समोर केली जाणारी आरास हि नेहमी परंपरे नुसार केलेली असतेच परंतु यंदाच्या वर्षी बजरंग भोसले यांनी माढा विधानसभेच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे “बदल हवा आमदार नवा” आणि “फिक्स आमदार आपले शिवबाबा” या आशयाचे दोन फ्लेक्स लावून शिवबाबा यांची क्रेझ कायम राहील याची काळजी घेतली आहे…

आपल्या आवडत्या युवा नेत्या प्रती सादर केलेले प्रेम पाहण्यासाठी श्रीपूर पंचक्रोशीतील अबाल वृद्धांनी बजरंग भोसले यांचे कौतुक करत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असुन गौरी गणपती च्या आशीर्वादाने माढा विधानसभा मतदार संघावर शिवबाबा यांच्या रूपाने आपल्या हक्काचा आमदार आपल्याला मिळणार हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button