२५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी,अधिकारी यांचे निवडणूक बाबत 26 व 27 ऑक्टोबर रोजी होणार प्रशिक्षण

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज माळशिरस (अ.जा.) २५४ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, २९ आक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर ३० रोजी अर्जाची छाननी होणार आहे.५ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्यात निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबर रोजी अकलूज येथे वखार महामंडळच्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार आहे.
२५ आक्टोबर अखेर ४२ उमेदवारांनी एकूण ६३ अर्ज खरेदी केले असून एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.
२५४ माळशिरस (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत प्रशिक्षण दि. २६/१०/२०२४ व दि. २७/१०/२०२४ रोजी चार टप्प्यात होणार असून दोन्ही दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वापेजर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत या दोन सत्रात प्रत्येकी ४५० कर्मचारी / अधिकारी यांचे प्रशिक्षण स्मृती भवन अकलूज येथे होणार असून, त्याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानयंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण महर्षी प्रशाला यशवंतनगर येथे होणार आहे. दोन्ही दिवशी १८०४ कर्मचारी / अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.



