महाराष्ट्र

अकलूजच्या मुस्लिम चळवळीतील “जहाल” मतवादी म्हणजे नबीलाल याकूब तांबोळी उर्फ पान दादा…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

कर्मवीर,सहकार महर्षी आणि धर्मवीर या त्रिमूर्तीनीं अकलूज च्या विकासाचा पाया रचला,त्या नंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अकलूज आणि मोहिते पाटील हे समीकरण गेली सात आठ दशके आपण पाहत आहोत,अनुभवत आहोत,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्या राजकीय प्रवासात अकलूज च्या मुस्लिम समाजाचा झेंडा खांद्यावर घेऊन निघालेला “जहाल” स्वभावाचा तत्कालीन युवक आज वयाची ऐंशी वर्षे पास करत अजुनही भक्कम स्थितीत उभा आहे,ज्यांच नांव नबीलाल याकूब तांबोळी…

नबीलाल तांबोळी यांना बऱ्या पैकी काही जण “चाचा” या नावाने ओळखतात तर त्यांची काही मित्र मंडळी हे “पान दादा” म्हणूनच हाक मारतात,नबीलाल चाचा यांना पान दादा हे नाव त्यांचे जिगरी दोस्त असलेल्या इस्माईलभाई मोहोळकर यांचा नातू असलेल्या “अब्रार” मुळे मिळाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही…

अकलूजच्या शिवापूर पेठेत जाताना अगदी कोपऱ्यावर असणारे पान दुकान नबीलाल चाचा यांनी साधारण पणे 1962 साली सुरू केले तद्नंतर आत्ताच्या जुन्या S T स्टँड मध्ये 1982 साली सुरु केलेले “यासीन पान स्टॉल” आज हि नव्या S T स्टँड मध्ये सुरु आहे…

जुन्या काळातील बंडु दादा बागवान,इस्माईलभाई मोहोळकर,शहाबुद्दीन मिस्त्री,मुख्तार झारेकरी,युसुफ साहेबलाल शेख,महंमदहुसेन कासिम बागवान,हाजी जहांगीर शेठ चौधरी,मोहन कलाल,बशीर शेख,कमाल शेख,आदील शेख सारख्या मित्र मंडळीनी पान दादा यांचे दुकान अगदी गजबजून जायचे…
अकलूज च्या कब्रस्तान येथील शाही मशिदी जवळ मुस्लिम समाजाचे जे वाहिद मरकज उभे आहे त्या “बजमे अनवारे सुफिया” मदरसाची मुहुर्तमेढ रोवली गेली ती याच तत्कालीन युवकांच्या काळात जी आजतागायत अखंडपणे सुरू असुन हाजी हाफिज साहेबांनी आणि सुफी साहेबांनी या सर्व ध्येय वेड्या तरुणांना एकत्रित करून समाजाचे आपण काही तरी देणे लागतो त्या समाजासाठी काही तरी चांगले काम करण्याची संधी हाफिज साहेबांनी आणि सुफी साहेबांनी या युवकांना दिली…

हल्ली पान दादा यांना वयोमानाने आणि त्यात त्यांना कमी ऐकु येत असल्या कारणाने सध्या ते घरीच जास्त असतात,आज त्यांचा नातू “बरकत” चा रिसेप्शन सोहळा स्वयमवर मंगल कार्यालय येथे पार पडला,या वेळी हजर असलेले पान दादा भारावून गेलेले पहायला मिळाले,त्यांचे जुने मित्र हाजी जहांगीर शेठ चौधरी यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला,पान दादा यांच्या अनेक जुन्या मित्रांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला…
“बरकत” च्या रिसेप्शन सोहळ्याने पान दादा यांच्या कुटुंबासाठी चार चाँद तर लावलेच होते परंतु पान दादा यांच्या उपस्थितीने त्यांच्या जुन्या मित्रांना एक वेगळाच आनंद अनुभवता आला हे नाकारता येत नाही…

हुमायून भाई,महेबुब भाई आणि आमचा मित्र खलील या सर्वांचे कुटुंब आज एकत्ररित्या आनंदात पाहताना कमी जाणवली ती आमच्या यासीन पैलवानाची हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
07:45