अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल स्क्रीनवर पहावयास मिळणार आय पी एल क्रिकेट सामन्यांचा थरार..!

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अनेक वेळा इतरांपेक्षा भाग्यवान ठरणारेअकलुजकर क्रिकेटसाठीही नशीबवान ठरले आहेत.आमदार.रणजितसिंह मोहिते-पाटील ,धैर्यशील मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्ना,तुन अकलुजकरांना क्रिकेट सामान्यांची मोफत मेजवानी देण्यात आली आहे.एप्रिल मध्ये होणाऱ्या आयपीएलचा थरार क्रिकेट प्रेमींना मोठ्या स्क्रिनवर विनामुल्य उपलब्ध करुन दिल्याने अकलुजकारांचे भाग्य पुन्हा एकदा उजळले असुन क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आमदार .रणजितसिंह मोहिते-पाटील,सोलापूर जिल्हा क्रीकेट असोसिएशनचे जाँईट सेक्रेटरी धैर्यशिल मोहिते-पाटील आणि अनेक उपक्रमातुन अकलुजकरांच्या मनात घर केलेले शिवतेजसिंह मोहिते-पाटील या बंधुनी अकलुजकरांना आयपीएल सामने मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह पाहण्याचा योग जुळवुन आणला आहे.

दि.२२ व २३ एप्रिल रोजी अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल मध्ये क्रिकेट प्रेमींसाठी बीसीसीआई कडून टाटा आयपीएल फॅन पार्कची उभारणी केली जाणार आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांना विनामूल्य मोठ्या स्क्रिनवर आयपीएलचा थरार अनुभवता येणार आहे.विविध राज्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांना विनामूल्य सामने पाहण्यासाठी आयपीएल फॅन पार्क तयार करते.त्याठिकाणी क्रिकेट रसिकांना बसण्याची व्यवस्था असल्याने मोठ्या स्क्रीनवर थेट सामना दाखला जातो. प्रेक्षकांसाठी फॕन पार्कमध्ये काही उपक्रमांसह करमणुक , स्वादिष्ट खाद्य पदार्थ आणि शितपेयांचाही आनंद घेता येणार आहे.

आयपीएलचा चैतन्यपुर्ण आनंद घेण्यासाठी दि.22व 23.रोजी सर्वांनी नातेवाईक,कुटुंबीय व,मित्रांसह फॕन पार्कमध्ये उपस्थित राहुन सामन्यांचा आनंद घेण्याचे अवाहन शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी क्रिकेट प्रेमींना केले आहे. तसेच आयपीएलशी अधिक बांधून ठेवण्यासाठी आणि स्टेडियमसारखा मनसोक्त आनंद अकलुजकरांना देणे हा या मागचा उद्देश असल्याचे सोलापूर जिल्हा क्रीकेट असोसिएशनचे ज्वाईट सेक्रेटरी धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.
२२ एप्रिल रोजी गुजरात टाईटन विरूद्ध लखनऊ जायंट व मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब इलेव्हन
२३ एप्रिल रोजी राॅयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध राजस्थान रॉयल्स तर चेन्नई विरूद्ध कोलकता या आयपीएल सामन्यांचा रणसंग्राम होणार असल्याचेही यावेळेस सांगितले .




