मकर संक्रांतीचे औचित्य साधत सौ देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथील विविध भागात दिल्या भेटी…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
नव वर्षाच्या सुरुवातीस येणाऱ्या “मकर संक्रांत” या सणाचे औचित्य साधत आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त अकलूज येथील ऐतिहासीक “विजय चौक” येथे असणाऱ्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्मारकाला सौ देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी विनम्र अभिवादन केले…

“युवा नेते” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ देवन्या मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचे हळदी कुंकवाचे आमंत्रण स्वीकारत सर्वांच्या भेटी गाठी घेण्याचा धडाका सुरू केल्यामुळे मोहिते पाटील गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे…

अकलूज येथील गुरूनगर,रामायण चौक,शिवाजी चौक,दत्त चौक,राऊत नगर,गांधी चौक अशा विविध भागातील मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सौ देवन्या मोहिते पाटील यांनी “हळदी कुंकू” या कार्यक्रमाचा निमित्त साधत अनेक महिलांशी वार्तालाप केला,या वेळी अनेक महिलांनी त्यांच्या सह स्थानिक अडीअडचणी संदर्भात अनेक विषयावर चर्चा केली असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…

या वेळी अकलूज आणि परिसरातील अनेक महिलांनी नव्या जुन्या आठवणीनां उजाळा देत सौ देवन्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सह मनमुराद संवांद साधला…