भाजप पालघर जिल्हा अध्यक्षपदी भरत राजपूत यांची नियुक्ती

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
भारतीय जनता पार्टी भाजप पक्षाच्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांची नव्याने भाजप पालघर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा पालघर जिल्ह्यातील वाढता जनसंपर्क व त्यांनी डहाणू तलासरी विक्रमगड येथे केलेल्या विकास कामाच्या तसेच भाजप पक्ष वाढीसाठी पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त करण्यात भरत राजपूत यांचा सिंहाचा वाटा आहे. भरत राजपूत यांनी पक्ष वाढीसाठी पालघर जिल्ह्यात केलेल्या कामाची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेऊन त्यांची निवड पालघर जिल्हा अध्यक्षपदी केली आहे.

येत्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार आणि एक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर सोपवली आहे. याआधी पालघर जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील असताना त्यांच्या राज्यात एक ही आमदार त्यांना निवडून आणताना आला नव्हता परंतु या 2024 च्या पालघर जिल्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार खासदार निवडून आणण्याचे आश्वासन नवनिर्वाचित भाजप पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिले आहे.



