महाराष्ट्र

माढा येथील कब्रस्तान मधील निवारा शेडचे रूपांतर मशीन असा उल्लेख केल्याने मुस्लिम बांधवाचे लाक्षणिक उपोषण

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरामध्ये असणाऱ्या कब्रस्तान मधील निवारा शेडचे रूपांतरण माढा नगरपंचायत प्रशासनाने नगरपंचायत दफ्तरी ठराव नमताना शेडच्या ऐवजी मशीदीमध्ये केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसोय लाक्षणिक उपोषण केले.

माढा शहरामध्ये मुस्लिम समाजाची दफन भूमी असून, सदर जागेवर
जनाजा नमाज पठण करणेसाठी सन २00५ मध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून निवारा शेड बांधण्यात आले आहे. त्याची तत्कालीन ग्रामपंचायत दफ्तरी नोंद करण्यात आली आहे. परंतु, सदरच्या निवारा शेडचे रूपांतरण मशिदीमध्ये नोंद करण्याच्या हेतूने मुख्याधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या असेसमेंट रजिस्टरमध्ये खाडाखोड करून कोणत्याही व्यक्तीच्या अर्जाविना, ठरावाविना व समाजातील कोणत्याही व्यक्ती ची सहमाती नसताना मनमानी करुन निवारा शेडचे रूपांतर मशोदीमध्ये करून त्याचे मशिद “गुलशन -ए -इमान” मध्ये नामांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपंचायत दफ्तरी असलेली मशीद “गुलशन-ए -इमान” ही नोंद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी माढा नगरपंचायत चे मुख्याधिकारी व प्रशासनाला करावेत अन्यथा मुस्लिम समाजाच्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या लाक्षणिक उपोषणावेळी दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. या उपोषणास जहीर जमाल मणेर, हारूण नजीर मुलाणी, सिकंदर अब्बास शेख,सोहेल ईलाही मुलाणी,उमर सैफन कोरबु,महमद पैगंबर तांबोळो,हमिद शेख यांच्यासह तीस पेक्षा आधिक समाज बाःधव उपस्थित हाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button