महाराष्ट्र
सिद हॉस्पिटल ते गिरजनी चौक (१००फुटी) येथे स्ट्रीट लाईट पोल अखेर उभारणार- महेश शिंदे

टाइम्स 9 मराठी न्युज
नवीन बाजार तळ सिद हॉस्पिटल ते गिरजनी चौक(१०० फुटी) येथे रेड लाईट पोल उभारण्यात यावे यासाठी अकलूज नगर परिषदेकडे १/०२/२०२२ रोजी पत्रव्यवहार केला होता.व आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्या वेळेचे तत्कालीन मुख्याधिकारी धैर्यशील जाधव साहेब यांनी तो प्रस्ताव जिल्हा परिषद कडून नगर परिषदेकडे वर्ग करून प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवण्यात येईल असे सांगितले होते..

त्यानंतर सतत नगर परिषदेशी संबंधित अधिकाऱ्याशी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्कात राहून आज अखेर येणाऱ्या "आर्थिक वर्षात निधी प्राप्त करून काम करण्यात येईल असे लेखी उत्तर अकलूज नगर परिषदे कडून देण्यात आले." तात्काळ आमच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट उभारण्यात येतील. अकलूज नगर परिषदेचे मनापासून आभार मानले.



