माळीनगर येथिल गरिब कुटुंबाला आरोग्यदुत रामभाऊ सातपुते यांनी केली मदत
प्रतिनिधी….. रियाज मुलाणी
मो नं 9921500780
माळीनगर( संग्रामनगर ) येथील एक गरिब कुटुंब गेल्या अनेक दिवसापासून कुटुंबातील एका व्यक्तीच्या आजारामुळे चिंतेत होते. त्यांनी माळीनगर व परिसरात प्रशांत भाऊ यांचे सामाजिक व आरोग्य विषयक कामाविषयी बरेच नाव ऐकले होते त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून लगेचच प्रशांतभाऊ यांची भेट घेतली व मदत करण्यासाठी विनंती केली
त्यावेळी प्रशांतभाऊ यांनी त्यांना तुम्ही कसलीही चिंता करू नका आपल्या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते साहेब तुम्हाला या अडचणीतून नक्की बाहेर काढतील असे आश्वासन दिले. व त्यांनी लगेचच रामभाऊ साहेबांची भेट घेऊन गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी विनंती केली कसलाही विलंब न करता त्यांनीही देखील त्यांना लगेच मदत केली
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रशांतभाऊ ताटे देशमुख हे त्या पेशंटला पुणे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले व तेथे त्यांचा उपचार केला आज ते पेशंट बरे होऊन घरी आले आहे त्या गरिब परिवाराने आरोग्यदूत रामभाऊ सातपुते साहेब व भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रशांतभाऊ ताटे देशमुख यांच्यामुळे आज आमचा परिवार आनंदी आहे असे सांगितले.