महाराष्ट्र

अकलूज येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती “पत्रकार दिन” म्हणून उत्साहात साजरी…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्युज,अकलूज
9890299499

सबंध पत्रकारांचे आद्य गुरू “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सबंध भारतामध्ये “पत्रकार दिन” म्हणून साजरी होत असताना हेच औचित्य साधून काल उपजिल्हा रुग्णालय,अकलूज येथे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील आणि अकलूज येथील पोलिस स्टेशन मध्ये आपली कारकीर्द गाजवणारे विश्वासराव साळोखे साहेब यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला…

तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे प्रमुख प्राचार्य यांच्या हस्ते आणि सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज येथे मुख्याध्यापक फुले सर यांच्या हस्ते तर अकलूज पोलिस स्टेशन येथे A P I विक्रम साळुंखे साहेब यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला…

सरते शेवटी सालाबाद प्रमाणे माळीनगर येथील द सासवड माळी साखर कारखान्याच्या अतिथी गृह येथे माळशिरस तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार मॅनेजिंग डायरेक्टर रंजन भाऊ गिरमे यांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यानंतर आलेल्या सर्व पत्रकारांना भोजनाची मेजवानी देण्यात आली…

या वेळी माळशिरस तालुक्यातील दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक तसेच पोर्टल न्यूज चे सर्व पत्रकार उपस्थित होते,

पत्रकारांच्या या सर्व सत्कार समारंभानंतर ज्येष्ठ पत्रकार भारत तात्या मगर यांनी सर्वांचे आभार मानले,या वेळी जुन्या ज्येष्ठ पत्रकारासह नवीन पत्रकारांची संख्या वाखाणण्याजोगी होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button