सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्यिक पुरस्कार जाहीर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार २०२५ वितरण सोहळा मा.श्री. विजयसिंह मोहिते- पाटील माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्षे दिले जात आहेत.
यावर्षी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विशेष साहित्यिक पुरस्कार लेखक, कांदबरीकार मा.विश्वास पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.
तर साहित्यीक पुरस्कार कथाकथनकार,लेखक व कवी मा.आप्पासाहेब खोत यांना देण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील इतिहासाचे अमुलाग्र लेखन करून अभ्यासकांना मोलाचे मार्गदर्शन करणारी ग्रंथसंपदा लिहून इतिहास लेखनात महत्वाची भर टाकल्याबद्दल मा.गोपाळराव देशमुख यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या शिवाय परिसस्पर्श या चरित्र ग्रंथाचे लेखक, कथा,पटकथा एकांकिका, लघुनाटीका, दिग्दर्शक, मालीका, चित्रपट गीत असे अष्टपैलू लेखक प्रमोद जोशी यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार-2024/25 हा वितरण सोहळा बुधवार दि. १५/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना प्रशासकीय कार्यालयातील उदय सभागृह येथे होणार आहे
सर्व साहित्य प्रेमी , वाचक, लेखक , कवी यांनी सदर पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन समिती द्वारे करण्यात आले आहे.