महाराष्ट्र

गणेशगाव येथील जळालेला विद्युत डीपी एका दिवसात बसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो.9921500780

गणेशगाव येथील थ्री फेज विद्युत डी पी जळालेला होता त्याची तात्काळ दखल घेऊन एका दिवसात दुसरा डी पी बसवून कार्यसम्राट माजी आमदार रामभाऊ सातपुते व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रशांतभाऊ ताटे देशमुख यांनी हे काम केले त्याचा पाठपुरावा करून एका दिवसात महावितरण चे अधीक्षक अभियंता काळे साहेब, व उपअधीक्षक अभियंता लोखंडे साहेब ,यांच्या सहकार्याने एका दिवसात डीपी बसवून घेतला त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सध्या जानेवारी महिना असून उन्हाळा चाहूल लागत असतानाच जळालेला विद्युत डीपी प्रशांतभाऊ यांच्या सहकार्यामुळे एका दिवसात बसवून दिला यावेळी गणेश गाव येथील शेतकरी सागर मोरे पाटील ,सागर सोलनकर, शंकर वाघमोडे ,यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button