विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत करणार- राजेंद्र गिरमे
प्रतिनिधि….. रियाज मुलाणी
मो.9921500780
माळीनगर येथील महात्मा फुले पतसंस्थेच्या वतीने दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू व गुणवत्तेच्याआधारे अशा १० विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना”अंतर्गत,दरवर्षी एक लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे म.फुले पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून माळीनगर येथे जाहीर केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेत विविध उपक्रमाने व बक्षिस वितरण समारंभाने साजरी करण्यात आली. प्रारंभी क्रांतिसूर्य म.फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संचालिका ज्योतिताई लांडगे व सौ.नेवसेताई यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे,खजिनदार ज्योतिताई लांडगे,विजय नेवसे,जयवंत चौरे, मिलिंद गिरमे,प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे ,पर्यवेक्षक कल्याण कापरे,स्पर्धा प्रमुख सुनील शिंदे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेमध्ये बक्षीसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.विविध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-वक्तृत्व स्पर्धा-इ.५ वी ते ६ वी गट – त्रिशा शिंदे(प्रथम),जान्हवी दाढे(द्वितीय),सरताज मुलाणी(तृतीय),वीरधवल हेगडे (उत्तेजनार्थ),इ.७ वी ते ८ वी गट – सोनम शिंदे(प्रथम),चैत्राली वाघमारे (द्वितीय), साईप्रिया यादव( तृतीय), सानिक होनमाने(उत्तेजनार्थ).इ.९ वी व १० वी गट-आरती साळुंखे(प्रथम),दिव्या सरवळे (द्वितीय), गौरी हुलगे( तृतीय).इ.११ वी व १२ वी गटांमध्ये प्रांजली साळुंखे(प्रथम),सोहम फुगे(द्वितीय),सिद्धी कोळेकर(तृतीय).मेहंदी स्पर्धा-इ.५ वी ते ६ वी गट-गलसनोबर सय्यद(प्रथम),आकांक्षा कोळी(द्वितीय),श्रेया काटे(तृतीय),सृष्टी काळे (उत्तेजनार्थ),इ.७ वी ते ८ वी गट- सीझा मुलाणी (प्रथम),स्नेहल वजाळे(द्वितीय),महेक शेख(तृतीय), सृष्टी काळे(उत्तेजनार्थ), इ.९ वी १० वी गट मुली-अवंतिका बेंद्रे(प्रथम),सानिया शेख(द्वितीय),सानिया बागवान(तृतीय),तृप्ती धुमाळ व मुस्कान शेख(उत्तेजनार्थ),
इ.११ वी १२ वी गट मुली- वैष्णवी आढाव (प्रथम), संस्कृती सुळ(द्वितीय),सृष्टी खरे(तृतीय),ऋतुजा कांबळे(उत्तेजनार्थ), मुले सहभाग-पवन रेणके (प्रथम),सोहम दळवी(द्वितीय).हस्ताक्षर स्पर्धा-इ.५ वी ६ वी गट- स्वराज सावंत (प्रथम),पृथ्वीराज गोरे(द्वितीय) स्वामिनी थोरात(तृतीय). इ.७ वी व ८ वी गट- पृथ्वीराज सावंत(प्रथम), सोहम लोखंडे(द्वितीय), सिद्धी तुपे(तृतीय),इ.९ वी व १० वी गट- समीक्षा खरात(प्रथम),दिव्या सरतापे(द्वितीय) रचना ओव्हाळ(तृतीय).इ.११ वी व १२ वी गट- तृप्ती इंगळे(प्रथम),आशिकी शेंडगे(द्वितीय),ऋतुजा खाडे(तृतीय).
यावेळी विद्यार्थिनींची भाषणे झाली.स्पर्धा पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नलवडे यांनी केले,बक्षिसाचे वाचन सविता पांढरे यांनी तर आभार आशा रानमाळ यांनी मानले.